सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
गुटखा विक्रेता किरण दोशी याचेकडून ४१ हजारांचा मुद्देमाल जप्तराजेंद्र बोन्द्रे
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण शहराला लागून असणाऱ्या कोळकी येथील नरसोबा नगरमध्ये एक गुटखा माफिया किरण शशिकांत दोशी याच्या घरामध्ये गुटखा आणि तत्सम पदार्थ यांचा विक्रीच्या उद्देशाने केलेला साठा जप्त करून पोलीस प्रशासनाच्या साह्याने फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रभर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कठोर कारवाईस सुरुवात केली आहे.
फलटण शहर आणि तालुक्यातील वस्तुस्थिती पाहता मागील तीन वर्षापासून अन्न व औषध प्रशासनाने फलटण शहरांमध्ये खुलेआम गुटका विक्री चालू असताना सुद्धा डोळे झाक करून कोणतीही कारवाई केली नव्हती. तसेच फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध विभाग यांनीही कोणत्याही प्रकारची संयुक्त कारवाई कधीही फलटण तालुक्यात झाली नव्हती. त्यामुळे मागील तीन वर्षापासून सहजपणे गुटका आणि मावा अशा प्रतिबंधित केलेल्या तत्सम पदार्थांची विक्री खुलेआम होत होती. शहरामध्ये अगदी परराज्यातून येऊन राजरोसपणे येथील व्यापाऱ्यांना हाताशी धरून फलटण शहर आणि तालुक्यात वाडी वस्तीवर अवैधपणे गुटख्याची विक्री चालू होती. यामुळे फलटण तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता बहुसंख्य नागरिक आपल्या मुलांच्या या व्यसनामुळे त्रस्त होऊन चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यावर फलटण शहरातील गुटखा विक्रीवर आता नक्कीच निर्बंध येणार अशी आशा नागरिकांना लागून राहिली होती परंतु महाराष्ट्रभर सर्वत्र कारवाई होत असताना फलटण शहरात मात्र कारवाई दिसून येत नव्हती. उलट मिळत असणारा गुटखा चढ्या दराने दुकानातून न विकता डिलिव्हरी बॉयच्या खिशातून शहरात विकला जात होता. फलटण शहरातील नागरिकांनी आमच्या सातारा न्यूज च्या टीमशी संपर्क साधून याबाबतची कल्पना दिल्यावर सातारा न्यूज च्या वतीने बातमी प्रकाशित केल्यावर तातडीने फलटण शहरात कारवाई केल्याचे निदर्शनास आले. याबाबत आमच्या सातारा न्यूज च्या टीमशी आज कारवाई झाल्यानंतर नागरिकांनी आमच्या टीमचे आभार व्यक्त केले.
आता फलटण शहर आणि तालुक्यात नागरिकांची अशी धारणा झाली आहे की तरुण पिढीच्या आरोग्यासाठी संपूर्ण फलटण तालुक्यातूनच गुटखा विक्री बंद होणे आवश्यक आहे. अन्न व औषध विभागाच्या वतीने शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये अजूनही गु टक्याचा अवैध धंदा करून बक्कळ लक्ष्मी प्राप्त करून दंड दांडगे पणाने मिरवत असणाऱ्या अजूनही अशा प्रकारच्या अवैध धंदेवाल्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून संपूर्ण फलटण तालुका गुटखा मुक्त करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
छोट्या छोट्या फळ विक्रेते आणि इतर व्यवसायिकांच्या फळांच्या आणि पदार्थांचे नमुने घेऊन कारवाई करण्यात येणार आहे असे अन्न व औषध विभागाच्या वतीने शहरात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी फळविक्रेत्यांना दिलेल्या माहितीनुसार समजून येत आहे.
परंतु फलटण शहरात एकच गुटखा व्यवसायिक नसून फक्त एक लुटूपुटू ची कारवाई करून न थांबता अजूनही गुटखा तस्कर म्हणून कु प्रसिद्ध असणाऱ्या अशा अवैध धंदा करणाऱ्यांची संख्या पाहता अजूनही मोठ्या कारवायांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अवैध रित्या गुटखा, पान मसाला सुगंधी तंबाखू यांची विक्री करणारा फलटण शहरा नजीक असलेल्या कोळकी येथील नरसोबा नगर मधील किरण शशिकांत दोशी यांच्या राहत्या घरी अन्न व औषध विभागाने फलटण शहर पोलीस स्टेशनच्या साह्याने कारवाई करून सुमारे 41 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रतिबंधित गुटखा पान मसाला असणाऱ्या एकूण सहा कंपनीवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपन्यांचे चालक-मालक भागीदार आणि संचालक यांच्यावरही याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलीस स्टेशनचे दिनेश शिंदे करत आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
संबंधित बातम्या
-
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
-
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 19th Jun 2026 01:13 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 19th Jun 2026 01:13 pm









