सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रकाश शिंदे- Fri 19th Jun 2026 05:45 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत अभिलेखावरील सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश केला असून, सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 10 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 27 लाख 65 हजार 476 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.
गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे मेढा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणात महेश भिमा शिंदे (वय 32, रा. शाहूनगर, सांगवी, ता. फलटण) याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पथकाने सलग तीन दिवस विविध ठिकाणी छापे टाकले. अखेर 8 जून रोजी सातारा शहरातील संगमनगर परिसरात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला. या तपासात मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण आणि कोरेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून चोरीस गेलेले 15.09 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 51 हजार 276 रुपयांचे चांदीचे दागिने, 12 लाख रुपयांची कार आणि मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 19 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, सफौ. अतीष घाडगे, राजु मुलाणी, पोहवा विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सुजित भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, हणंमत भोसले, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, स्वप्निल शिंदे, किरण जगताप, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, इरफान मुलाणी, महेश निर्मळ, शिवाजी गुरव, आनंदा भोये, महिला पोलीस अंमलदार स्वाती रणपीसे, शकुंतला सणस, अधिका वीर, प्रीती पोतेकर, काजल साबळे, अपेक्षा देवाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगावमध्ये गॅस कटरने ATM मशीन फोडून ६ लाख ६१ हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्हीचेही केले नुकसान
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
-
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
-
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
-
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 19th Jun 2026 05:45 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 19th Jun 2026 05:45 pm









