सातारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचा आज वाढदिवस

वाढदिवस विशेष

!! वाढदिवस विशेष!!

 

सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वृषाली देसाई यांचा आज वाढदिवस.. लहानपणापासून खाकी वर्दीची आवड होती जिद्द मेहनत करून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून सन 2014 साली राज्य पोलीस दलात वृषाली देसाई दाखल झाल्या. आज अखेर आपले कर्तव्य बजावताना देसाई यांची पोलिस खात्यात निष्कलंक कारकीर्द आहे. व त्यांचा स्वभाव अतिशय मृदु व हळव्या स्वभावाच्या महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.. लहानपणापासून चांगल्याशी चांगले व वाईटाशी वाईट हा त्यांचा गुण आत्मसात करण्यासारखा आहे. सात्विक विचार हे मनुष्याला प्रगतीच्या मार्गावर नेत आहोत. माणुसकी जपणे हा गुणधर्म असणे गरजेचे आहे.अशातच एक महिला पोलीस अधिकारी म्हणून देसाई उदयास येत आहे कोरोनाच्या कठीण काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चेक पोस्टवर आपल्या बाळाला दूर ठेवुन अहोरात्र आपले कर्तव्य व जवाबदारी यशस्वीपणे पेलली होती.मायेपेक्षा कर्तव्य मोठे म्हणून काळजावर दगड ठेऊन या मायेने कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावले आहे.. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई आधी खाकी मग बाकी या उक्तीला अनूसरुन खाकी वर्दीतील स्त्री शक्ती असे आपले कर्तव्य बजावताना दिसतात याच कर्तव्यासाठी तत्कालीन सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला होता सलाम तुमच्या वर्दीला सलाम तुमच्या धाडसाला, कर्तव्यदक्ष,कर्तव्यकठोर,वर्दिची शान राखणार्या,कोणाच्याही दबावाला बळी न पडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी म्हणजेच वृषाली देसाई . आपल्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना कोणाचे तरी मोलाचे मार्गदर्शन मिळत असते त्यामुळेच आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळत असते. व माझ्या यशात आई वडील भाऊ बहीण पती यांचा खुप मोठा पाठिंबा आहे व हेच माझ्या यशाचे गमक आहेत असे वृषाली देसाई नेहमी सांगतात .. अशा या खाकीतल्या रणरागिणीला पोलीस मित्र श्री.उदय आठल्ये यांच्याकडून वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला