शासकीय चित्रकला परीक्षेतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल करंजे पेठ साताराचे यश

तर चि. श्रेयस सचिन पाटील (इयत्ता आठवी ) राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत सांघिक सिल्वर मेडल

सातारा: शिक्षण प्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, करंजे पेठ,सातारा चे एलिमेंट्री परीक्षेस 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी कु . प्रेरणा खंदारे  व  कु.स्नेहल सुनिल जाधव या दोन विद्यार्थिनी 'अ 'श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या आहेत. तसेच चार विदयार्थी 'ब 'श्रेणी तर इतर विद्यार्थी उत्तम गुण  मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
      इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेस एकूण 33 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी चि. ओंकार सुनिल सकपाळ व चि. आयुष रमेश साळुंखे यांस 'अ ' श्रेणी प्राप्त झालेली आहे तर सात विद्यार्थ्यांना 'ब ' श्रेणी तर इतर विदयार्थी  उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
     या  सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ .वत्सला डुबल , दोन्ही उपाध्यक्ष मा. श्री. नंदकिशोर जगताप, मा. श्री. जगन्नाथ किर्दत, सचिव मा. श्री. तुषार पाटील, स्कूल कमिटी चेअरपर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण व  संचालिका मा.सौ. हेमकांची यादव व इतर मा. सदस्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षिका कु.दिपाली कदम व सौ.मेघा पोतदार यांनी मार्गदर्शन केले.

याच संस्थेचा विद्यार्थी चि. श्रेयस सचिन पाटील(इयत्ता आठवी ) याने 14 ते 15  वयोगटामध्ये  राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत सांघिक सिल्वर मेडल 

शिक्षण प्रसारक संस्था,करंजे पेठ, साताराच्या आर्चरी अकॅडमी चा खेळाडू व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलकरंजे पेठ चा विद्यार्थी चि. श्रेयस सचिन पाटील(इयत्ता आठवी ) याने 14 ते 15  वयोगटामध्ये  राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत रिकर्व या प्रकारात सांघिक सिल्वर मेडल मिळवले.
       त्याचे व शिक्षण प्रसारक संस्था आर्चरी अकॅडमीचे  प्रशिक्षक श्री. सुशांत साळुंखे सर यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ .वत्सला डुबल , दोन्ही उपाध्यक्ष मा. श्री. नंदकिशोर जगताप, मा. श्री. जगन्नाथ किर्दत, सचिव मा. श्री. तुषार पाटील, स्कूल कमिटी चेअरपर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण व  संचालिका मा.सौ. हेमकांची यादव व इतर मा. सदस्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला