उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांचे चिरंजीव धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी मंगळवारी सकाळी मुंबई येथे अजित पवार यांची आपल्या कार्यकर्त्यासमवेत भेट घेतली. 

फलटण तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये राजकीय खलबते चालू आहेत. 

त्यातच सोशल मीडियावर फलटणच्या खासदार गट आणि राजे गटाचे मनोमिलन होणार आहे, अशी जोरदार चर्चा फलटण तालुक्यात सर्वत्र आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे शिवरूपराजे खर्डेकर यांचे चिरंजीव धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट फलटणच्या राजकीय क्षेत्रात कोणती खळबळ माजवून देणार अशी नवीन चर्चा उदयाला आली आहे. 

मागील दोन-तीन आठवड्यापासून दोन्ही गटांचे मनोमिलन होणार ? यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

त्यातच दोन्ही गटांचे नेते यावर मात्र कोणतेही भाष्य करत नसल्याने या चर्चेला नागरिकांच्या मनामध्ये मनोमिलनाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क वाढीस लागले आहेत. विशेषता विधानसभेच्या वेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून निवडणुकीसाठी अपार कष्ट घेतले होते आणि या परिवर्तनाच्या लाठे मध्ये अजितदादा पवार यांनी विद्यमान आमदार सचिन पाटील यांना निवडून आणण्यात खासदार गटाच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले होते. 

त्यातच आज फलटण तालुक्यात युवा वर्गामध्ये लोकप्रिय असणारे धीरेंद्रराजे खर्डेकर आणि अजित दादा पवार यांची मुंबईत झालेली भेट या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार चे फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांचे निकटचे संबंध पाहता आणि सातारा जिल्ह्यात खासदार नितीन काका पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत कशी पोहोचवता येतील याबाबत शिवरूप राजे खर्डेकर यांची नेहमीच सकारात्मक भूमिका असल्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत कोणती रणनीती आखली जात आहे याकडे फलटण तालुक्यातील मतदार राजांचे लक्ष वेधले आहे. 

या झालेल्या भेटीबाबत अजित दादा पवार यांनी धीरेंद्र राजे खर्डेकर यांच्याकडून फलटण तालुक्यातून स्थानिक आघाडीच्या बाबतची माहिती घेऊन सातारा जिल्ह्यात खासदार नितीन काका पाटील मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि बाळासाहेब सोळसकर यांच्या मार्गदर्शनानुसार युवा कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येयधोरणे समजावून देऊन सक्रिय करण्याचा सल्ला ही दिला आहे. अशी माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार हे नेहमीच युवकांना प्रेरणा देऊ पक्षाच्या कार्यात सक्रिय करत असतात. फलटण तालुक्यातील पुढील राजकारणात धीरेंद्रराजे खर्डेकर हा नवा चेहरा अजितदादा पवार आपल्या मार्गदर्शनाने पुढे आणण्याची संकेतच या सर्व राजकीय घडामोडी वर दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी माननीय अजित पवार यांनी युवकांनी सक्रिय होऊन आता नवीन राजकारणाची दिशा ठरवली पाहिजे असेही भाष्य केले होते या भेटी मध्ये हेच संकेत सुरू झाले आहेत अशी चर्चा आता फलटण तालुक्यात आढळून येऊ लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला