फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
रामाच्या नगरीत गोडबोले शहा यांच्या अतीने झाली मातीSatara News Team
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण शहर पोलीस स्टेशन येथे मागील दोन वर्षांपासून कार्यरत असणारे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची कारकीर्द वेगवेगळ्या कारणामुळे वादग्रस्त दिसून येत होती.
रात्री उशिराच फलटण शहरात हेमंत कुमार शहा यांची तडकाफडकी बदली प्रसार माध्यमाद्वारे फलटण शहरातील नागरिकांच्या सोशल मीडियाद्वारे निदर्शनास आल्यावर फलटण शहरात काळानुसार एक वेगळ्या विचाराची असणारी जनरेशन झेड तरुण पिढी सोशल मीडिया द्वारे आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे आपल्या प्रतिक्रिया देऊ लागली यामुळे आज सकाळपासूनच फलटण शहरात चर्चेचा विषय म्हणजे हेमंत कुमार शहा यांची बदली का झाली. ?. किंवा आपल्या वादग्रस्त कारभारामुळे स्वतःहूनच करून घेतली अशा खूबसदार चर्चेला रंगत आली.
गणेशोत्सवात डीजे बाबतची वादग्रस्त भूमिका पाहता स्वतः डीजेवर सोशल मीडिया द्वारे लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत बेफाम वाजलेला डीजे आणि नागरिकांना झालेला प्रचंड त्रास पाहता आणि त्याचबरोबर गिरवी नाक्यावर पोलीस स्टेशनच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्वांच्या समोरच डीजेच्या तालावर त्यांचेच नाचलेले गणेश भक्त चर्चेचा विषय झाला होता.
फलटण शहरात मागील दोन वर्षात उभे राहिलेले अवैध धंदे आणि सर्वसामान्य नागरिकांना होत असणारा त्रास पाहता तसेच अवैध धंद्यामुळे गोरगरीब लोकांचे उध्वस्त होत असलेले संसार
यामुळे फलटण शहरात कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजलेले दिसून येत होते. फलटण शहर ऐतिहासिक सांस्कृतिक अध्यात्मिक आणि धार्मिक वारसा असणारे शहर म्हणून त्याची महाराष्ट्रात संपूर्णता ओळख आहे दरवर्षी परंपरेने चालू असणारा रामाचा रथोस्तव आणि आळंदीच्या माऊलीची आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी यामुळे फलटण शहरात बारा महिने पांडुरंगाच्या नामाचा जयघोष होत असणारी ही रामनगरी मागील दोन वर्षापासून मात्र हेमंत कुमार शहा यांच्या कारकिर्दीत बोकाळलेले अवैध धंदे मटका, जुगार, चक्री, आणि पोलीस प्रशासनाचा धाक नसल्यामुळे वाढलेली गुन्हेगारी यामुळे या सुसंस्कृत शहराची ओळख पुसट होण्यास सुरुवात झाली होती मागे काही दिवसापूर्वी एका पक्षाच्या कार्यकर्त्यावर घरात घुसून झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी आत्मसंरक्षणासाठी फिर्यादीने केलेल्या प्रतिकार पाहून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल करून पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष च्या समोरच तुम्ही आरोपी आहात तुम्ही तुमची जास्त बाजू मांडण्याचा प्रयत्न करू नका असे सांगून संशयित आरोपीवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली अशा प्रकारची बरीचशी उदाहरणे पाहता एकूणच यांची कारकीर्द नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसून आली विशेषता फलटण शहरात असणारे चक्री जुगार सारख्या अवैध धंदे यांच्या काळात वाढीस लागले .चक्रीचे आयडी सहज उपलब्ध होऊन फलटणच्या चौका चौकात चक्रीने धुमाकूळ मांडला यामुळे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मात्र डोळेझाक करण्यात येत असल्यामुळे हा चर्चेचा विषय संपूर्ण जिल्ह्यात झाला होता अगदी आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा चक्री खेळायला लोक फलटणचा असणार चक्रीचे माहेरघर येथे आपली हजेरी लावू लागले आणि याच फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या साह्याने नित्य आनंद प्राप्त करणारे काही सहकार्य अधिकारी यांच्या आई कर्तव्याबाबत लोकांच्या साशंकता वाढीस लागली होती.तडीपार केलेले गुन्हेगार तडीपार झाल्यानंतर मात्र कोणाच्या वरद हस्ताने शहरात राजरोसपणे वावरत होते हेही लोकांच्या निदर्शनास आल्यामुळे फलटणमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उत्पन्न झाला होता.
गणेशोत्सवाच्या दरम्यान डीजे बंदी च्या नावाखाली स्वतःचे हात ओले करून घेतल्याची चर्चा कालपासून मात्र फलटण शहरात चांगलीच रंगली होती.
हेमंत कुमार शहा यांच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात घरपोडी वीज वितरण कंपनीच्या असणाऱ्या डी पी ची चोरी शहरामध्ये सदैव होत असणारी वाहतूक कोंडी आणि अवैध धंद्यांचे तर माहेरघर म्हणून फलटण शहराची ओळख होऊ लागली.
वाहनांची चोरी तर नित्याचीच बाब होऊन गेली होती. फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाची तर दुचाकी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या आवारातूनच चोरी झाली होती, पण या प्रकाराबाबत मात्र कुठेही वाच्यता झाली नाही. सर्वकाही आळी मिली चूप गीली अशी अवस्था फलटण शहरात झाली होती.
हेमंत कुमार शहा यांच्या मनमानी उद्धट कारभाराला मात्र सर्वजण वैतागलेले दिसून येत होते. सर्वसामान्य जनता ते सर्वच राजकीय नेतेमंडळी यांना सदैव गोड बोलून आपले कार्य मात्र ते सहज शितापीने चालू ठेवत होते.
तक्रारदार फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला गेल्यावर प्रथम गोड बोलून गुन्हा नोंद न करता फिर्यादी आरोपी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करून फलटण शहर पोलीस स्टेशन येथेच न्यायालयाच्या अगोदर आपण स्वतःच पुढाकार घेऊन न्यायालयाचे कार्य तेथेच करत असल्याची जाणीव ही बऱ्याच फिर्यादींना झाली होती.
मागील काही महिन्यांपूर्वी एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनला आले असता एक प्रसारमाध्यमाचा प्रतिनिधी चर्चेचे व्हिडिओ शूटिंग घेत असताना त्याला मज्जाव करून आमची चर्चा चालू आहे व्हिडिओ शूटिंग घेऊ नका तुम्हाला वाटलं तर काय लिहायचं ते लिहा त्याच्याबद्दल मला काही फरक पडत नाही एवढं वक्तव्यही त्यांनी केले होते यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सुद्धा आदर न करणाऱ्या या मिस्टर शहा यांना नक्की वरदहस्त कोणाचा होता हे मात्र अजूनही जनतेला न उमगलेलं कोड आहे.
पण या बदलीच्या प्रसारमाध्यमा बाबत झालेल्या माहितीने नागरिक मात्र पुढील येणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याबाबत मात्र आता बऱ्याचशा अपेक्षा बाळगून आहेत यामुळे नव्याने दाखल झालेले फलटण शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे यांची जिल्ह्यांतर्गतच बदली झालेली आहे त्यामुळे कराड येथून आलेला हे नवीन अधिकारी या फलटण शहराची सुसंस्कृत शहर म्हणून असणारी ओळख जपण्याचा प्रयत्न करणार का? की शहा यांचीच कारकीर्द पुढे चालू ठेवणार याबाबत मात्र आता जनता डोळे लावून वाट पाहत आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न फलटण शहरात उभा राहिल्यामुळे गुन्हेगारीवर कोणाचा धाकच नव्हता असे चित्र फलटण शहरात होते रस्त्याने होणारी मुलींची छेडछाड महिलांच्या गळ्यातील दागिने भर दिवसा हिसकावून पळून जाण्याचे प्रकार यावर मात्र या मागील दोन वर्षात भरपूर वाढ झालेली दिसून येत होती यामुळे या शहरात असणारा सुसंस्कृत महिला वर्ग अत्यंत नाराज दिसून येत होता. आजपर्यंत झालेल्या दागिन्यांची चोरी घरफोडी चे किती गुन्हे उघड झाले हा मात्र संशोधनाचा विषय झाल्यामुळे आता नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाबत अपेक्षा उंचावलेल्या आहेत शहराच्या संस्कृतीनुसार फलटण शहरातील नागरिक नेहमीप्रमाणे फलटण शहराची संस्कृती जपण्यासाठी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करणारच, पण या उत्स्फूर्त स्वागता द्वारे नूतन पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे यांच्यावर जबाबदारी पण दिली जाणार आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढणार हे निश्चित झाले आहे.
फलटण शहरात आणि तालुक्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच आपलं कर्तव्य निर्भीड आणि निपक्षपणे बजावणारी पत्रकारिता म्हणून फलटण तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ख्याती आहे. अशा या वृत्तपत्र माध्यमातून आपल्या पत्रकारितेतून मागील आठवड्यापासून उठवलेला आवाज या बदलीच्या अनुषंगाने बरच काही सांगून जातो. फलटणकर नागरिक हे नेहमीच फलटणच्या पत्रकारितेला प्रथम प्राधान्य देतात कारण फलटणची पत्रकारिता नेहमीच जनतेच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात निर्भीडपणे जनतेचा आवाज बुलंद करताना दिसून येते. फलटण शहरात हतबल असणारे व्यापारी त्यांच्यावर होत असणारा अन्याय अत्याचार नेहमी शहरात दिसून येत होता पण कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजल्यामुळे व्यापारी वर्गही भीतीच्या छायेखाली वावरत होता आणि अजूनही आहे. शहर आणि शहराच्या आजूबाजूला असणारे उद्योजक यांनाही त्याचा नाहक त्रास भोगावा लागत होता.
हा मिस्टर शहा अध्याय आता संपलेला असला तरी नवीन आलेले पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे यांचा नवा अध्याय या फलटण शहराच्या शांत आणि नागरिकांची संयमी भूमिका अशा ऐतिहासिक धार्मिक वारसा असणाऱ्या सुसंस्कृत शहराच्या असणाऱ्या समस्या अवैध धंदे घरफोडी महिलांचे दागिने चोरी इत्यादी बाबत आता काय भूमिका घेणार याकडे फलटणकर जागरूक नागरिक अपेक्षा बाळगून पाहत आहेत.
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
संबंधित बातम्या
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Sat 11th Oct 2025 01:05 pm
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Sat 11th Oct 2025 01:05 pm












