फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
Satara News Team
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
- बातमी शेयर करा
फलटण : सातारा येथे जिल्हा परिषद च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवसेनेचा कार्यकर्ता आणि मेळावा कार्यक्रमात फलटण तालुक्यातील उद्योजक श्री अमोल भैया संपतराव निंबाळकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पालकमंत्री आमदार श्री शंभुराजे देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
अमोल भैया निंबाळकर यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात शिवसेना पक्ष आता आणखी उत्तम संघटन करू शकेल अशी आशा फलटण तालुक्यातील नागरिकांच्या आणि विशेषता युवक वर्गांच्या मध्ये निर्माण झाली आहे त्याचे कारण ही असं आहे की श्री अमोल भैया निंबाळकर यांना फलटण शहरांमधून असणारा राजकीय वारसा त्यांच्या मातोश्री सौ .नंदाताई संपतराव निंबाळकर ह्या फलटण शहराच्या माजी उपनगराध्यक्ष होता त्यांनी त्यांच्या उपनगराध्यक्षाच्या कार्यकालात सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शहरांमध्ये एक नगरसेवक या पदाला आपल्या कार्याने न्याय दिला होता. त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्री अमोल भैया निंबाळकर हे पूर्वीपासूनच सामाजिक आणि धार्मिक कार्यात एक उत्तम कुशल संघटक म्हणून ओळखले जातात समाजामध्ये सर्वसामान्यांच्या व्यथा जाण्याचं ज्ञान त्यांनी त्यांच्या मातोश्रीच्या कार्याकडून घेतल्यामुळे मनमिळाव स्वभाव आणि सर्वसामान्य सहजपणे मिळून मिसळून जाण्याची असणारी वृत्ती यामुळे फलटण शहरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः युवा वर्गामध्ये त्यांचे उत्तमाचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत.आणि या संबंधाचा फायदा नेमका शिवसेनेने घेऊन आपल्या पक्षाला सक्रिय करण्यासाठी या युवा उद्योजकाची निवड करून पक्षाची संघटना मजबूत करण्याचा मानस केला आहे. पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या चाणाक्ष बुद्धीने अमोल भैयांच्या कार्याची दखल घेऊन तसेच गेली कित्येक वर्ष महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेहमीच गणेशोत्सवात वेगवेगळे धार्मिक सामाजिक आध्यात्मिक कार्यक्रमाचे फलटण शहरात नेहमीच आयोजन करत असताना दिसत आहेत.
विशेषता आपल्या सामंज्याच्या भूमिकेने आणि युवा वर्गाच्या अडचणीला उभे राहणार एक व्यक्तिमत्व अशीच ओळख फलटणच्या युवा वर्गामध्ये त्यांचे आहे फलटण शहर आणि फलटण ग्रामीण भागात नेहमीच निंबळक या गावचे हे सुपुत्र आणि त्यांचे कुलदैवत निमजाई देवीचे आणि लालबागच्या राजाचे गणेश भक्त म्हणून त्याची ख्याती आहे आणि तोच धार्मिक आणि सामाजिक वारसा आपल्या मातोश्री पासून घेऊन सदैव समाजामध्ये मिळून मिसळून राहून आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून ते नेहमी सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य करत आलेले आहेत शहरातील वेगवेगळे प्रतिष्ठित व्यक्तींशी वेगवेगळ्या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींशी त्यांचे अतिशय असणारे सलोख्याचे संबंध तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जोडलेली नाती वेगवेगळ्या व्यवसायिकांशी उत्तम संबंध तसेच वेगवेगळ्या उच्च अधिकार्यांशी असणारे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध पाहता नक्कीच शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नक्कीच ठसा उमटवतील अशी आशा युवक वर्गामध्ये दिसून येत आहे या पक्षामुळे फलटण शहरातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
फलटण शहरात राहणारा या निंबाळकर कुटुंबा चा सर्वसामान्य नागरिकांशी असणारा संपर्क आणि सर्वसामान्य नागरिकांचा या कुटुंबाशी असणारा आत्मीयतेचा संबंध पाहता सर्वसामान्य नागरिक नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमोल भैया निंबाळकर यांच्या पाठीशी राहतील असे आत्ता तरी युवा वर्गाच्या उत्साहाने दिसून येत आहे.
या प्रवेशाच्या वेळी सातारा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री शरद कणसे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव आणि विशेषता फलटण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सातारा जिल्हा शिवसेना समन्वयक श्री विराज खराडे. फलटण, तालुकाप्रमुख श्री नानासो इवरे, फलटण तालुका समन्वयक विजय मायने आणि इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
संबंधित बातम्या
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Fri 17th Oct 2025 04:16 pm
-
प्रीतम कळसकर यांच्या वाढदिनी उद्या विविध उपक्रमांचे आयोजन
- Fri 17th Oct 2025 04:16 pm








