फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.

फलटण : आगामी फलटण पंचायत समिती ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच आरक्षणाची सोडत झाल्यावर प्रत्येक पंचायत समिती गणात इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करून मतदार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. 

फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री संजय सोडमिसे यांच्या सुविधे पत्नी सौ सारिका सोडमिसे यांच्या उमेदवारीसाठी मात्र सांगवी गणात समाविष्ट असणारी गावे सांगवी राजाळे टाकळवाडी सोनगाव आणि सोमंथळी या गावातून श्री संजय सोडमिसे यांच्या पाच वर्षाच्या पंचायत समिती सदस्याच्या आणि उपसभापतीच्या कालावधीत गणामध्ये त्यांनी या सांगवी गणामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार अत्यावश्यक असणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा आणि विकासाची कामे केल्यामुळे सांगवी गणातील मतदार राजा त्यांच्या उमेदवाराची आग्रही मागणी करताना दिसून येत आहे. 

श्री संजय सोडमिशे हे पंचायत समितीचे उपसभापती असताना आणि पहिल्यापासूनच आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी सांगवी गणात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गावात रस्त्यांच्या सुविधा महिला व बालकल्याण विभागाकडून असणाऱ्या शासकीय योजना तसेच सतत गणातील नागरिकांशी संपर्कात राहून त्यांच्या विविध अडचणी समस्या समजून घेऊन लोकप्रतिनिधी या नात्याने न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे 

पंचायत समिती च्या माध्यमातून त्यांनी आपल्या गणात समाविष्ट असणाऱ्या या पाच गावात रस्त्यांची कामे प्राथमिक शाळेसमोर असणारे ब्लॉग्स व सुशोभीकरण पिण्याच्या पाण्याच्या योजना अंगणवाडीसाठी असणाऱ्या सुविधा अशा प्रकारच्या विविध  विकास कामांच्या पूर्ततेच्याअनुषंगाने आता या गणा तील सर्व नागरिक महिला ओबीसी आरक्षण झाल्यामुळे श्री संजय सोडमिशे यांच्या सुविधा पत्नी सौ सारिका सोडमिशे यांना उमेदवारी देऊन गणातील विविध समस्यांचा निपटारा संजय सोडमिसे यांच्याप्रमाणे त्याही करतील अशी आशा त्यांना आहे. 

सो सारिका संजय सोडमिसे या सुद्धा नेहमीच महिलांच्या विविध कार्यक्रमात तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमात नेहमीच हिरीरीने वाटा घेत असतात महिलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात त्या संपूर्ण गणात विशेषता सांगवी गावात अतिशय लोकप्रिय आहेत शांत आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व तसेच वेळप्रसंगी लोकांच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची वृत्ती पाहता सौ सारिका संजय सोडमिसे यांचे पारडे सांगवी गणात जड दिसून येत आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित होतात त्यांचा विजयही निश्चित आहे अशी प्रतिक्रिया या गणातील गावातील नागरिकांच्यातून येत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला