सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
Satara News Team
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे दोन आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
परळी (ता. सातारा) येथील समीर असीफ मुलाणी यांच्या घराच्या अंगणातून २९ मार्च २०२६ रोजी हिरो स्प्लेंडर (एमएच ११ बीएम ०१९७) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना चोरीस गेलेले वाहन सातारा शहर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोडोली परिसरातून एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे सातारा तालुका व सातारा शहर पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप कर्णे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, सहाय्यक फौजदार उमेश माने, पोलीस हवालदार संदीप कर्णे, दादा स्वामी, शिखरे, पंकज ढाणे, मनोज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, प्रल्हाद ढाकरे, संदीप आवळे, अभिजित मोरे, उमेश बगाडे, पाचांगणे तसेच होमगार्ड विवेक शेडगे व सचिन सुतार यांनी केली.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी कौतुक केले आहे.
#crime
#crimenews
#police
#satarapolice
स्थानिक बातम्या
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
संबंधित बातम्या
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Thu 4th Jun 2026 08:26 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Thu 4th Jun 2026 08:26 pm












