सातारा व सोलापूरच्या तत्कालीन एसपी श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीला पंतप्रधानांचा पुरस्कार जाहीर
ऑपरेशन परिवर्तनचा देशात डंका...Satara News Team
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
- बातमी शेयर करा

तेजस्वी सातपुते "द रियल हिरो"
सातारा : कायदा व सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य आणि 'बातें कम काम ज्यादा" ही सातपुते यांची कार्यपद्धती राहिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने लोक प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार (पीएम अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन) सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या ऑपरेशन परिवर्तनला जाहीर झाला आहे. जिल्हा पातळीवरील नाविण्यपूर्ण उपक्रम या गटातून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूरच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविलेल्या या उपक्रमाची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ऑपरेशन परिवर्तन व लातूर जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी सोलापूर व लातूर या दोनच जिल्ह्यांची निवड झाली आहे.या पुरस्काराचे वितरण दि.२१ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणार आहे. तत्कालीन पोलिस सातपुते कालावधीत या पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्यात आले होते.दि.२ फेब्रुवारी रोजी त्यांनी तज्ज्ञ समितीसमोर तर दि.१८ मार्च रोजी केंद्रीय सचिवांच्या समोर तत्कालीन पोलिस अधीक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तनचे सादरीकरण केले होते.सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती व विक्री बंद करणे, त्यातून होणारी गुन्हेगारी रोखणे, या व्यवसायातील व्यक्तींचे समुपदेशन व पुनर्वसन करणे या उद्देशाने ऑपरेशन परिवर्तन हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील हातभट्टी बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या गावांचा सव्र्व्हे करण्यात आला. जिल्ह्यातील ६० गावांमध्ये हातभट्टी तयार करून १२४ गावांमध्ये विक्री होत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले होते. ग्रामीण पोलिसातील प्रत्येक अधिकाऱ्यांना यापैकी एक गाव दत्तक देऊन या गावांसाठी यांच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम हाती घेतला होता. १८ महिन्यांमध्ये हा व्यवसाय सोडून अन्य व्यवसायात पदार्पण केले आहे. शेती, मजुरी, पशुपालन, कपडे विक्री, किराणा दुकान, खासगी कंपनीत नोकरी या माध्यमातून हातभट्टी निमिर्ती व विक्री व्यवसायातील व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे.या उपक्रमाची दखल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते..
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
संबंधित बातम्या
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
कराड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
हजारो भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थिती सेवागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- Sun 26th Mar 2023 09:23 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Sun 26th Mar 2023 09:23 pm