माण : माण तालुका रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांच्या विविध प्रलंबित मागण्या व अडचणी बाबत शासनाकडून तत्काळ कारवाई व्हावी यासाठी माण तालुका रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन
परवानाधारक संघटनेने माण तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन केले व आपल्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर व तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, रेशन दुकानदार केरोसीन परवानाधारक दुकानदार यांच्या प्रलंबित कमिशन वाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा त्याचबरोबर धान्य वाटपाची कमिशन हे दरमहा पाच तारखेपर्यंत मिळावे, रेशन धान्य वाटपाबरोबरच डाळी खाद्यतेल,साखर इतर जीवनावश्यक वस्तूची विक्री करण्याची परवानगी मिळावी. एफसीआय गोडवूनमधून येणारे धान्य शासनाच्या नियमाप्रमाणे जेवढ्या वजनाचे आहे. तेवढेच मिळावे ग्राहकाला धान्य देते वेळी धान्याची नासाडी होते त्यामुळे शंभर किलो मागे एक किलो धान्याचे सूट पूर्वीप्रमाणे मिळावी तसेच प्रत्येक धान्य दुकानदारा ना केवायसी करण्यासाठी दहा रुपये मोबदला मिळावा अशा विविध मागण्या दहिवडी तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटने कडून करण्यात आले आहेत.
या आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवानराव गोरे, उपाध्यक्ष वसंत भोसले,राजकुमार सूर्यवंशी, सचिव दादासाहेब काळे व सर्व रस्ताभाव दुकानदार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.