सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी
Satara News Team
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
- बातमी शेयर करा
सातारा :
दिनांक १८/४/२०२५ ते ०९/०५/२०२५ या कालावधी मध्ये जॉर्डन (अमन) येथे सुरु असलेल्या १५ वर्षाखालील आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये भारत देशाचे प्रतिनिधीत्व करणारे सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी कुमार यश ववन निकम (३० ते ३३ किग्रॅ वजनी गट) व कुमारी समृद्धी सतीश शिंदे (५२ ते ५५ किग्रॅ वजनी गट ) यांनी कांस्य पदक प्राप्त केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला पदक प्राप्त करुन देणारे सातारा जिल्ह्यातील पहिले महिला व पुरुष खेळाडु ठरले आहेत.
सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु असलेल्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधुन अनेक गुणवंत खेळाडु घडत आहेत. सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातुन गुणवंत खेळाडु घडविण्याची मालिका कायम सुरु असुन पाल्यांना उत्तम प्रशिक्षक वर्ग व आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालक वर्गाकडुन व इतर सर्व विभागांकडुन सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे कौतुक होत आहे.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांना श्री सुनिल सपकाळ स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, सॅम्युअल भोरे सहा. स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक पोहवा /१९० सागर जगताप (एन. आय.एस. बॉक्सींग प्रशिक्षक ), मपोकॉ / ८४ पुजा शिंदे ( बॉक्सींग प्रशिक्षक ) यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील पदक प्राप्त प्रशिक्षणार्थी व त्यांना उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शन व प्रशिक्षण दिलेले प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय कामगिरी बाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उप-अधीक्षक (गृह), श्री. राजु शिंदे राखीव पोलीस निरीक्षक, श्री सुनिल चिखले पोलीस उप-निरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय सातारा यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Wed 30th Apr 2025 04:06 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Wed 30th Apr 2025 04:06 pm













