तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई आज रोजी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी बोरगाव परिसरात उरमोडी नदीजवळ पार पडली. पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांचे अधिपत्याखालील ट्रक क्रमांक MH 50/4096 मधून रॉयल किंग स्पेशल मॉल्ट व्हिस्की, रॉयल ब्लॅक अ‍ॅपल वोडका, रॉयल ब्ल्यू मॉल्ट व्हिस्की अशा विविध प्रकारच्या ८४ लाखांहून अधिक किंमतीच्या बनावट विदेशी दारूचा साठा आढळून आला आहे. याशिवाय ट्रकची किंमत १६ लाख ५० हजार रुपये असल्याने एकूण जप्त मालाची रक्कम झाली आहे १ कोटी ०० लाख ९१ हजार ०४० रुपये ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या चमूने केली.सदर इसमांवर बोरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग, बोरगाव पोलिस स्टेशन, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे ४० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सध्या या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

 श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई मध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. माधव चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सातारा, सहा. पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, बोरगाव पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेकडील, सहा. पोलीस निरीक्षक, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, सहा.फौ. विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, पो.हवा. साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, शरद बेबले, प्रविण फडतरे, सनी आवटे, अमित झेंडे, अजय जाधव, रोहित तोरस्कर, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रविण कांबळे, ओंकार यादव, रविराज वर्णेकर, धिरज महाडीक, केतन शिंदे, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार चालक संभाजी साळुंखे, विजय निकम, शिवाजी गुरव, बोरगाव पोलीस स्टेशनकडील मपोउनि स्मिता पाटील, प्रविण शिंदे, संजय जाधव, राज्य उत्पादन शुल्क सातारा कडील दुय्यम निरीक्षक, अजितकुमार पाटील, विजय मरोड, जितेंद्र देसाई, कॉन्स्टेबल मनिष माने, नरेंद्र कलकुटगी, शंकर चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे.

 आरोपीचे नाव १) सचिन विजय जाधव रा. आळसंद ता. खानापुर जि. सांगली. २) जमीर हरुण पटेल रा. आगाशिवनगर मलकापूर ता. कराड जि.सातारा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला