मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

दहिवडी पोलीसांनी चौकशी करून आरोपींना केले अटक.

आंधळी, ता : २९ मोगराळे ता. माण गावच्या हद्दीत हनुमान मंदिराजवळ झालेल्या मारहाण शिवीगाळ दमदाटी प्रकरणी सात जणांविरोधात उत्तम प्रल्हाद सावंत वय 54 वर्ष रा.मोगराळे यांनी तक्रार दिली असून दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 याबाबत मिळालेली माहितीशी की, गावातील हनुमान मंदिराजवळ लाईटच्या उजेडात बोलत उभे असताना अचानक अनोळखी व्यक्ती हर्षद संजय जाधव रा. जाधववाडी याने माझा भाऊ पंढरीनाथ याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याचा मित्र श्रेयस उत्तम नाळे, वैभव रामचंद्र सोनवलकर, सागर रघुनाथ मदने,सागर रामदास अडके, सुमित राजू जाधव सर्व रा. दुधेबावी ता. फलटण व्यक्ती यांनी माझ्याजवळ येऊन मला त्याच्या हातात असलेल्या कोयतेच्या मूठीने व काठीने मारहाण करून शिवीगाळ,दमदाटी केली. तसेच हर्षल जाधव यांनी माझ्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले व त्या ठिकाणी आमच्या नादाला लागला तर एकालाही सोडणार नाही अशी मोठ्याने धमकी देऊन काही अंतरावर उभे असलेली गावातील तुकाराम जगदाळे यांच्या ओमनी गाडीवर दगड टाकून तिच्या काचा फोडल्या व गाडीवरून निघून गेले.

याबाबत त्यांच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाणे मध्ये तक्रार देण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पो. उपनिरीक्षक गुलाब दोलताडे,पो.हवा. चंद्रकांत शिंदे, नितीन धुमाळ,महेश सोनवलकर, आसिफ नदाफ, आजिनाथ नरबट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे यांनी गुन्हे कामे शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतली व अटक करण्यात आली असून अधिक तपास पो. हवा विठ्ठल विरकर करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला