महाबळेश्वरशेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती
Satara News Team
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
- बातमी शेयर करा

पाचगणी : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरशेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
जावळी आणि सातारा या दोन तालुक्यांतील ५२ गावांमध्ये हे महाबळेश्वर निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे जावळी सातारा तालुक्यातल्या निसर्गरम्य डोंगर पठारावरी गावांना पर्यटन वाढीची चालना मिळणार आहे
याबाबतचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले असून तीन वर्षांत आराखडा पूर्ण केला जाणार आहे.
राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा आदींचा समावेश होतो. महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी • पसंती असते. येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातून या ठिकाणी येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरीस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातून कोयना बँक वॉटरच्या भागातील सुमारे ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी आणि सातारा या तीन तालुक्यांतील ५२ गावांमध्ये हे महाबळेश्वर निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.
निसर्गरम्य परिसर
हा परिसर सह्याद्री उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या बहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे. सर्वेक्षण करणार राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून (एमएसआरडीसी)
सन २०१९मध्ये नियुक्ती केली. याच वर्षी या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार होते, मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे तीन वर्षे प्रकल्पाच्या कामाला थांबा मिळाला होता. एमएसआरडीसीकडून महिनाभरात या क्षेत्राचा भूवापर नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ड्रोन आणि जीआय सर्वेक्षणाच्या आधारे ते पूर्ण केले जाणार आहे. 'महाबळेश्वरचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आराखडा मंजुरीसाठी पुढील तीन वर्षांचा कालावधी लागेल,' अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
पर्यटनातून स्थानिकांना रोजगार नवीन महाबळेश्वरच्या परिसरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ५२ गावांतील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे शोधून त्यांचा विकास केला जाईल. त्यातून आणि इतिहासप्रेमी या भागात आकर्षित होतील. पर्यटकांसाठी सोयीसुविधा आणि अस्तित्वातील रस्त्यांचे जाळे सुधारले जाणार आहे. रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन विकसित केले जाईल.या गावांचा समावेश नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, जावळी तालुक्यातील अंधारी, कास, कसबे बामनोली, सावरी, पाटण तालुक्यातील गोशटवाडी, आंबेघर तर्फ, बागलवाडी, सावरघर, चाफोली आदी गावांचा समावेश असेल.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
संबंधित बातम्या
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
कराड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
हजारो भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थिती सेवागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- Thu 22nd Sep 2022 06:30 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Thu 22nd Sep 2022 06:30 am