पोलिसावर पत्नीची तक्रार.अदखलपात्र गुन्हा दाखल
Satara News Team
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातील वाद पोलिस ठाण्यात आला आहे. ‘त्या’ बाईशी संबंध ठेवायचे, असेल तर तू माझ्याकडे येऊ नको, असे पत्नीने सांगितल्याने संतप्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याने ‘मी आता ‘त्या’ बाईला घरी आणणारच. तुला बघून घेतो,’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर पोलिस पत्नीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पती जिल्हा पोलिस दलात कार्यरत असून, त्यांच्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. यावरून त्यांच्यात वाद सुरू आहेत. त्या बाईशी संबंध ठेवायचा असेल तर तू माझ्याकडे येऊ नकाे, असे पत्नीने पतीला सांगितले. तसेच माझी आई आणि सासूनेही पतीला तू त्या बाईचा नाद सोडला पाहिजे, असे सांगितले. या रागातून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने दोघींनाही हाताने मारहाण केली. मी आता त्या बाईला घरी आणणारच. तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन त्यांनी शिवीगाळ केली असल्याचे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर दि. ३१ रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित जगदाळे हे अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
संबंधित बातम्या
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 2nd Sep 2024 10:48 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 2nd Sep 2024 10:48 am












