बालिका दिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये माता आणि कन्या यांचा सत्कार करण्याचा अनोखा उपक्रम

या कार्यक्रमाचे आयोजन रसायनशास्त्र विभागाच्या मार्फत करण्यात आले होते

सातारा : स्त्री-पुरुष ही एकाच गाडीची दोन चाके आहेत, त्यातील एक चाक थोडेसेही फिरले तर त्याचा परिणाम दुसऱ्या चाकावर दिसून येतो. पुरुष आणि स्त्रिया एकमेकांना पूरक आहे. एक दुसऱ्याशिवाय चालत नाही.


 पण त्याच समानतेत स्त्रीने थोडी जरी प्रगती केली तर पुरुष जातीला ते अजिबात आवडत नाही. म्हणे स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक आहेत, पण समानता फक्त पुरुषांसाठी आहे. जोपर्यंत ती स्त्री त्याच्याबरोबर चालते परंतु त्याच्या पुढे नाही तोपर्यंतच हे चांगले आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरुषांना बाहेर काम करावे लागते आणि बायकांनी घर सांभाळावी, असे वृद्ध लोकांचे मत होते. पण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन थोर व्यक्तींमुळेच स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत नुकत्याच झालेल्या चंद्रयान मोहिमेत सुद्धा स्त्रियांचा मोठा वाटा होता तसेच स्त्री पुरुष समानता व महिला सबलीकरण यामध्ये जनजागृती होण्यास करिता लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा रसायनशास्त्र विभागामार्फत कन्या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व पालक मेळाव्याचे अजून करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय बालिका दिन निमित्त स्त्री पुरुष समानता व महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान इतिहास विभाग प्रमुख डॉ पी.सी. चिकमट मॅडम यांनी दिले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफे.डॉ. रेखा नलवडे मॅडमनी केले अध्यक्षीय मनोगत डॉ. सी.पी. माने व श्री मोहिते सर (उपप्राचार्य) यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रज्ञा लोंढे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाच्या आभाराचे काम स्नेहल चव्हाण मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमास लालबहादूर शास्त्री कॉलेजच्या सायन्स विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमांतर्गत सर्व महिला पालकांचे व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला