शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या

फलटण : फलटण शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ठेवलेल्या स्टेटसवरुन अनिकेत घाडगे या युवकाला असीम आतारने जीवे मारण्याची धमकी दिली होती तसेच त्याच्या राहत्या घरी जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण केली होती. यामुळे फलटण शहरामध्ये हिंदू समाज बांधव आक्रमक झाले होते. आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू समाज बांधवांनी केली होती. आज शुक्रवार पेठेतील मोहल्ला गल्ली येथे लपून बसलेल्या असीम आतार या आरोपीच्या फलटण शहर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने मुसक्या आवळल्या.

   या कारवाईत फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक काळे, दिनेश शिंदे, साहेब टिके, महेश जगदाळे, जयपाल यादव यांनी या कारवाईत भाग घेऊन पोलिसांना गुंगारा देत असलेल्या असीम आतारच्या मुस्क्या आवळल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला