जि.प. प्राथमिक शाळा कळंभे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा

वाई : वाई तालुक्यातील कळंभे येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात
     त्यापैकी विद्यार्थी यांच्या अंगी असणाऱ्या नृत्य नाटय व गायन यां कलांना उस्फूर्त वाव देणारा उपक्रम म्हणजे . विविध गुणदर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन कळंभे येथे मोठया दिमाखात संपन्न झाला
     कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय सौ ज्योतीताई गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौआश्विनी वाघ व सदस्या यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली, स्वागत गीत इयत्ता ६वी ७ वी च्या विद्यार्थिनीनी यांनी सादर केले व त्यानंतर इयत्ता ७ वीच्या मुलांनी सुत्रसंचलन करून विविध गुणदर्शन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली 
   हिदंवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची महती सांगणारी विविध गीते, पोवाडा, श्लोक. इयत्ता १ली ते ४थी च्या मुलांनी सादर केले
      तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी तुळजाभवानी माता हिचा जयघोस करणारी गीते , तसेच महाराष्ट्राचे राज्याचे प्रशिध्द नृत्यप्रकार , लावणी हा ५वी ते ७ वी मधील मुलींनी वैयक्तिरित्या सादर केला तसेच प्लास्टीकचे दुष्परिणाम सांगणारी नाटीका = मले बाजाराला जायाचं नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमी वाईटच असतो हे सांगणारी, अति तिथं माती ही नाटीका तसेच विनोदी नाटीका बंडूची इजार या नाटीका ५वी ६वी ७वी तील मुलामुलींनी अतिशय चागल्या प्रकारे सादर केल्या
     तसेच इंग्रजी विषयाची गोडी निर्माण होणारी इंग्रजी नाटयछटा इयत्ता २रीच्या मुलामुलींनी सादर केली या बरोबर देशभक्तीपर गीते मैत्रीपर गीते तसेच बालगीते व नृत्य प्रकारांचे सादरीकरण लहान मुलांनी केले
       गावातील दोन्ही अंगणवाडीतील बालचमूंचीही ठेका धरायला लावणारी गीते यावेळी सादर करण्यात आली शेवटपर्यत प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवणारा बहारदार असा विविध गुणदर्शनाचाकार्यक्रम शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन येथे  संपन्न झाला
        यावेळी कार्यक्रमास सरपंच सौ ज्योतीताई गायकवाड उपसरपंच श्री प्रकाश बाबर श्री संभाजी गायकवाड श्री आबाजी सुतार सौ सारीकाताई गायकवाड सौ निलम शिवथरे सौ शकुंतला चव्हाण जि प शाळा मुख्याध्यापक सौ विनया पवार सौ सविता निबांळकर श्री राजेद्र जाधव सर श्री सुरेश जगदाळे सर व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ आश्विनी वाघ सौ दिपाली शिवथरे सौ कल्याणी शिवथरे सौ निवेदिता सुतार  नजराणा मुलाणी अंगणवाडी सेविका सौ दिपाली नलावडे सौ दिपाली शिवथरे विकासघर  शिक्षिका सौ गौरी चव्हाण सौ माधूरी शिंगटे कार्यक्रमात उपस्थीत होते विशेष सहकार्य शिवशक्ती ग्रुप कळंभे या मंडळाच्या कार्यकत्यांचे लाभले या कार्यक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला