ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा

ज्या पालकांचे पाल्य शासकीय शाळेत शिकत नाहीत, त्यांना रेशन सह इतर शासकीय सुविधा बंद..

पुसेसावळी : वडी ता.खटाव येथे गावातील अंगणवाड्या, जि.प.प्राथमिक शाळा व वडी हायस्कुल येथील शासकीय शाळांमधील घटत असलेल्या विद्यार्थी संख्येवर तोडगा काढणे साठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.


 यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थीती दर्शवून शाळेसाठीच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. सध्या इ. १ ली ते ७ वी पर्यंत एकूण ५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच इ. ८ वी ते १० वी पर्यंत ही काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटसंख्येच्या आधारावर जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत मात्र तीनच शिक्षक उपलब्ध आहेत. तीन शिक्षकांना सात वर्ग सांभाळून इतर शासकीय कामांना वेळ द्यावा लागत आहे. काही ठराविक शिक्षण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांनी शासन दरबारी हेलपाटे मारून मुख्यमंत्री कौशल्य योजने मधील एक कर्मचारी पदरात पाडून घेत गुणवत्तेशी तडजोड न होण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु तरीही इंग्रजी माध्यमाच्या चमकोगिरी पुढे भाळून गावातून बाहेर शिकायला जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या ३५ ते चाळीसच्या दरम्यान आहे. 


 गावातील शासकीय शाळा टिकाव्यात यासाठी वडी येथील ग्रामसभेमध्ये काही महत्त्वाचे आणि धडाडीचे ठराव पारित करण्यात आले. हे ठराव शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील आणि गावक-यांचा सहभाग वाढवतील अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली. त्यापैकी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठराव म्हणजे गावातील शासकीय शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश न घेता पदरचे पैसे खर्च करून विद्यार्थ्यास शारिरीक व मानसिक त्रास देऊन चमकोगिरी करणा-या खाजगी शाळांमध्ये प्रवेश देणे म्हणजे स्वत:ची ऐपत किंवा नसलेला मोठेपणा जगासमोर दाखवण्याचा उत्तम मार्ग असा विचार सर्वरूढ झालेला दिसतोय. मग फुकट किंवा माफक पैशाच्या मिळणा-या शासकीय रेशनिंगसाठी मात्र दिवस खर्ची घालण्याचे पाप कशासाठी करायचे? पोरा-बाळांना केजी-नर्सरी-पहीली पासून बाहेरगावी शाळा शिकवताना खर्च करायला परवडते तर फुकटचे आणि माफक दरातले राशन का घेता? सरकारी लाभ घ्यायचे तर फायदा खाजगी शाळावाल्यांचा का करून देता? म्हणुन स्वस्त धान्य दुकानांच्या लाभार्थी यादीतून त्या कुटुंबाना वगळण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून त्याबाबतचा प्रस्ताव तालुका पुरवठा विभागाकडे देण्यासंदर्भात ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली तद्नंतर तो ऐतिहासिक ठराव बहुमताने पास झाला. त्याचबरोबर राशन लाभ घेत नसलेले परंतू गावाबाहेरील शाळांमध्ये पाल्य घातलेल्या कुटुंबाना प्राथमिकतेने कोणत्याही प्रकारचे शासकीय लाभ न देण्याचा ठराव देखील याच विशेष ग्रामसभेमध्ये बहुमताने पारित करण्यात आला. 


 हायस्कुल व प्राथमिक शाळांचे दोन्ही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजाराम येवले व श्री. दत्तात्रय येवले यांच्या विनंती मागणीनुसार ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेला ग्रामसेवक अनुपस्थित असल्याने मुख्याध्यापिका श्रीमती थोरवे मँडम यांनी सचिव म्हणून कार्यभार सांभाळला तर अध्यक्ष म्हणुन सरपंच सौ. वैशाली येवले यांनी काम पाहीले. सभेचे प्रोसिडिंग श्री.सुर्यकांत कदम गुरुजींनी वाचून सभेस सुरुवात केली. अंगणवाडीच्या श्रीमती सुर्यवंशी मँडम, श्रीमती येवले मँडम, श्रीमती जगताप मँडम व हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.विकास अडसुळे सर यांनी आपापल्या शाळांची परिस्थीती व विद्यार्थी संख्या बाबत समस्या ग्रामसभे समोर मांडली. यावेळी माजी सरपंच मा.नामदेव पाटील, मा.प्रकाश मोहीते, माजी सरपंच मा.अनिल सुर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मा.अभिजीत येवले यांनी आपली मते मांडली. शेवटी चेअरमन गणेश येवले यांनी सर्व ठराव मंजूर करण्यात आले नंतर सर्व उपस्थितांचे आभार मानले.


वडी गावासाठी वरदान ठरलेल्या व सध्या काम सुरु असलेल्या विटा-महाबळेश्वर रस्त्यावरील पुलाला (ब्रिजला) सामाजिक कार्यकर्ते व गावचे दिवंगत विकासपुरुष कै. जगन्नाथ बंडोबा जाधव शेठ यांचे नाव देण्याचा ठराव माजी सरपंच नामदेव पाटील यांचे सुचनेनुसार बहुमताने पारित करण्यात आला.               श्री. विजय बाळासाहेब जाधव, संचालक, विकास सेवा सोसायटी, वडी


भौतिक सुविधा, इमारत निधी, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, डागडुजी यांचबरोबर अवांतर वर्ग (एक्स्ट्रा क्लासेस), डिजीटल शिक्षण, गुणवत्ता शिष्यवृत्ती, पोषण आहार यांविषयी उपस्थित अनेक शिक्षण प्रेमींनी आपले विचार मांडले. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, ग्रामसभेचा पुढाकार आणि शिक्षकांचे अवांतर व प्रामाणिक कष्ट यांमधून भविष्यात गावातील शाळांमधून नक्कीच यशस्वी व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी तयार होतील असा विश्वास ग्रामस्थांना मिळाला. श्री.अनिल सुर्यवंशी, माजी सरपंच   


ग्रामसभेसाठी वडी गावाला नवनियुक्त ग्राम महसूल अधिकारी श्रीमती. ऐश्वर्या कांबळे या आवर्जून उपस्थित होत्या. सर्व ग्रामस्थांचे वतीने सुप्रसिद्ध उद्योजक मा.विठ्ठल येवले(शेठ), व सरपंच सौ.वैशाली येवले यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सत्काराचा स्विकार करताना विविध शासकीय योजनांची माहीती त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला