‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
Satara News Team
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : सुखकर्ता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मुंबई यांच्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन जनरल मॅनेजर एकनाथ माळी,संचालक संजय घोडे,सर्जेराव घोडे,अमर जाधव,शिवाजी मोहिते,नूतन माळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाडी परीक्षण,मॅग्नेटिक एनलायझर मशीन च्या साह्याने मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी यासारखे उपक्रम राबवण्यात आले. सुखकर्ता को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मोहिते यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास राज्यात २२ शाखांच्या माध्यमातून ६५ कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षात ३० शाखांचा टप्पा पुर्ण करणार आहे.४६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.५००० कोटींचे उद्दीष्ट असून त्याकडे खातेदारांच्या माध्यमातून वाटचाल सुरू आहे.
जत,कवटेमहांकाळ,दहिवडी,वाई,सांगोला या ठिकाणी नव्याने शाखा स्थापन करणार असल्याचे मत जनरल मॅनेजर एकनाथ माळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी शाखा मॅनेजर जीवन अवघडे,ज्योत्स्ना वाघमारे,दिग्विजय मोरे कॅशियर प्रियांका कणसे,अमित धुमाळ यांच्यासह कर्मचारी,ठेवीदार,कर्जदार,खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sat 12th Jul 2025 02:56 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sat 12th Jul 2025 02:56 pm











