श्री क्षेत्र सज्जनगडावरील समर्थांचा पुण्यस्मरण उत्सव सोहळा
Satara News Team
- Wed 15th Feb 2023 11:44 am
- बातमी शेयर करा

सातारा : माघ कृष्ण नवमीला 'दासनवमी' असे म्हणतात. आज बुधवार, दि. १५ फेब्रुवारी 2023 रोजी दासनवमीचा उत्सव साजरा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर या तिथीला श्रीसमर्थ रामदासस्वामींची पुण्यतिथी अतिशय भक्तिपूर्वक साजरी केली जाते. 'सज्जनगडवारी' म्हणून प्रतिवर्षी वारी करणारे महाराष्ट्रातील असंख्य समर्थभक्त या दिवशी गडावर येतात. मोठ्या श्रद्धेने समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांचे स्मरण करतात. समर्थांच्या समाधी समोर बसून केलेला संकल्प पूर्ण होतो .तसेच गडावर काही तरी 'चिरंजीवीत्व ' पण अधिवास करून असावे.असे सुद्धा मनोमन जाणवते.
मुळात वारीचा हा सोहळा माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत एकूण दहा दिवस चालतो. यामध्ये ज्याला जेव्हा शक्य होईल, त्याप्रमाणे मंडळी गडावर दर्शनासाठी येतात. माघ कृष्ण पंचमीला समर्थांच्या सर्व शिष्यांच्या परंपरेतील शिष्य, महंत, अनुयायी आपापल्या मठांच्या पालख्यांसह साताऱ्यात येऊन दाखल होतात. त्यांची शहरातून मिरवणूक निघते.
राजवाड्यासमोर या मिरवणुकीवर फुले गुलाल उधळून स्वागत केले जाते. नवमीच्या दिवशी गडावरील रामदासी मठाधीश भिक्षा मागतात. त्यांना भक्तमंडळींकडून अतिशय भक्तिप्रेमपूर्वक भिक्षा घातली जाते. याच दिवशी म्हणजे नवमीला निर्वाणाचे कीर्तन केले जाते. दहा दिवस गडावर येणाऱ्या सर्व दर्शनार्थींसाठी महाप्रसादाची चोख व्यवस्था केली जाते. समर्थ रामदास स्वामींविषयीची सर्व विश्वसनीय माहिती आज आपल्याला त्यांच्या विविध चरित्रग्रंथरूपात उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये समर्थांनी केलेले जनजागृतीचे कार्य अनन्यसाधारण आहे. छ. शिवरायांबद्दल समर्थांनी लिहिलेल्या काव्यपंक्ती अजरामर आहे.शिवरायांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण पुढील पिढीने करावे .असे समर्थांना वाटते.ते म्हणतात की,' शिवरायांचे कैसे चालणे!शिवरायांचे कैसे बोलणे!शिवरायांचे कैसे सलगी करणे !
शिवरायांचा कैसा सांक्षेप भूमंडळी !निश्चयाचा महामेरू !बहुत जनांसी आधारु!अखंड स्थितीचा निर्धारु !श्रीमंत योगी!यशवंत , किर्तीवंत, वरदवंत,पुण्यवंत , नितिवंत,जाणता राजा ! '
जीवनात पावलोपावली दक्ष राहून स्वत:ची आणि समाजाची उन्नती कशी साधता येईल, प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करता येईल, हे विचारधन समर्थांनी श्रीदासबोधातून आपल्या पुढील पिढ्यांसाठी भरभरून राखून ठेवले आहे, हे आपले केवढे महाभाग्य! म्हणूनच केवळ दासनवमीच्या दिवशीच नव्हे तर रोज निदान एक तरी श्रीदासबोधाचा समास प्रत्येकाने वेळात वेळ काढून अवश्य वाचावा. समर्थांचे ' प्रपंच विज्ञान ' तर अप्रतिम आहे.ते म्हणतात की,
' पहिले ते हरिकथा निरूपण , दुसरे ते जीवन विज्ञापण ,तिसरे ते अखंड सावधपण ,सर्व विषयी ! ' समर्थांच्या एका ओवीवर एका एका माणसाचे संपूर्ण जीवन घडू शकते.श्री 'मनाचे श्लोक ' ही सतत मनन पठनात असले, तर तेही उत्तमच. हल्ली या ग्रंथाच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. त्यादेखील ऐकता येतील. रोज अकरा श्लोक म्हणून मनाला बोध घ्यावा. तसेच ' फुल ना फुलाची पाकळी' म्हणून सज्जनगडावर यथाशक्ती दान करावे. असे आचरण केले तरंच खऱ्या अर्थाने दासनवमी साजरी केल्याचे समाधान व जीवनाचे सार्थक होईल.
* जय जय रघुवीर समर्थ *
स्थानिक बातम्या
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 15th Feb 2023 11:44 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 15th Feb 2023 11:44 am
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Wed 15th Feb 2023 11:44 am
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Wed 15th Feb 2023 11:44 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Wed 15th Feb 2023 11:44 am
भरदिवसा गळा चिरला :शिवथरमध्ये महिलेचा निर्घृण खून
- Wed 15th Feb 2023 11:44 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Wed 15th Feb 2023 11:44 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Wed 15th Feb 2023 11:44 am