श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा येथे...संपन्न झाला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा...

सातारा :  शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ, सातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा येथे क्रीडा व शैक्षणिक वर्ग व विषयात यशस्वी झालेल्या गुणवंतांचा पारितोषिक व आकर्षक बक्षीसे देऊन यथोचित गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सातारामधील प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती शिला गीते तर व्यासपीठावर संस्थेचे सर्व मान्यवर पदधिकारी अध्यक्ष सदाशिव कुंभार उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप,संस्था सचिव तुषार पाटील, स्कूल कमेटी चेअरमन वत्सलाताई डूबल,संस्था संचालिका हेमकांची यादव,प्रतिभा चव्हाण संचालक रविंद्र जाधव आणि मान्यवर उपस्थित होते...
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र फडतरे यांनी केले.. देणगीदारांचा संस्थेच्या पदाधिका-यांच्या हस्ते योग्य सन्मान करण्यात केला.. देणगीदारांमध्ये श्रीमती शिला गीते,संस्था उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप,सौ.प्रतिभा चव्हाण,विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक विकास शिंदे सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुनंदा जाधव,सौ.अश्विनी गायकवाड,शंकर किर्दत महेश शेडगे आणि संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते..
  संस्थेच्या वतीने संस्था संचालिका व माजी  शालाप्रमुख सौ.प्रतिभा चव्हाण यांचे मनोगत झाले..त्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या प्रगतीत संस्थेचे योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन करताना ज्यांच्यामुळे आपण जीवनात यशाची शिखरे गाठत आहोत त्या आपल्या संस्थेला आणि शाळा माऊलीला कधीही विसरु नका असा संदेश  यशस्वी विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना दिला आणि आपल्या मनोगताची सांगता केली...
   तदनंतर विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा व यशस्वी खेळाडूंचा व्यासपीठावरील पाहूण्यांच्या आणि देणगीदारांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला..
    तदनंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शीला गीते यांचे अनमोल मार्गदर्शन झाले.. त्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई वडिल आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करावी असे सांगून सर्वांनी सुसंस्कार आत्मसात करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना संस्थेने व शाळेने कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्धल धन्यवाद व्यक्त केले.
   
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत गायकवाड,गौरी पवार,प्रियंका इंदलकर,सुशांत साळुंखे आणि काशिनाथ वाईकर यांनी केले...तर आभार पर्यवेक्षक अमर वसावे यांनी मानले...आणि कार्यक्रमाची सांगता झाली..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त