सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Satara News Team
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यात क्षयरोग निदानापासून वंचित असणार्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी क्षयरूग्ण शोधमोहिम राबवली जात आहे. दि. 23 डिसेंबर ते 3 जानेवारीअखेर राबविण्यात येणाऱ्या क्षयरूग्ण शोध मोहिमेत शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजेच 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी 160 पथके तयार केली असून शहरी व ग्रामीण भागातील 64 हजार 129 घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यात क्षयरोग निदानापासून वंचित असणार्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी क्षयरूग्ण शोधमोहिम राबवली जात आहे. जिल्ह्याील 64 हजार 129 घरी 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण आशांमार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी 160 पथके तयार केली आहेत. यामध्ये पर्यवेक्षक व 422 कर्मचारी असणार आहेत. 10 टक्के लोकसंख्येमधून 16 हजार 32 संशयित रूग्ण शोधण्यात येणार आहेत.
त्यापैकी 321 क्षयरूग्ण शोधण्यात येणार आहेत. या सर्व क्षय रूग्णांना औषध उपचार व तपासणी, डीबीटीद्वारश दरमहा 1 हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. तसेच दर महिन्याला फूड बास्केटही दिली जाणार आहे.
सर्व्हेक्षणासाठी आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सर्व क्षयरोग संशयितांची थुंकी नमुना तपासणी, आवश्यक असल्यास क्ष-किरण तपासणी केली जाणार आहे.
#Tubercolosis
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
संबंधित बातम्या
-
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
-
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
-
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
-
शिवकालीन शासकीय पाणंद अतिक्रमणांच्या विळख्यात
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
-
कर्मवीर विद्यापीठात समुह विद्यापीठाबाबत कार्यशाळेचे आयोजन
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
-
स्वतंत्र सैनिक, संजय गांधी निराधार, अपंग व्यक्ती यांना वेळेत मानधन देण्यात यावे : संजय भोसले
- Fri 20th Dec 2024 12:53 pm
-
'सातारा हाॅस्पिटल व सातारा डायग्नोस्टीक सेंटर'यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
- Fri 20th Dec 2024 12:53 pm