ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न

सातारा : येथील संविधान गौरव परिषद व सर्व संविधानप्रेमी यांच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांनी संसदेत केलेल्या निंदनीय वक्तव्याविरोधार्थ छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आरएमएम फुटपाथवर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी अस्लम तरडसरकर, पार्थ पोळके,चंद्रकांत खंडाईत, अशोक भोसले,डी. एस.भोसले, परवेज सय्यद,वामन मस्के, चंद्रकांत मस्के,अंकुश धाइंजे, प्रकाश खटावकर,प्रकाश तासगावकर,सतिशराव माने, विजय मोरे,नंकुमार काळे,बी. एल.माने,जगदीश गायकवाड, सुभाष सोनावणे,भरत लोकरे, सुरेश कोरडे,प्रमोद क्षीरसागर, प्रा.दत्तात्रय जाधव, ऍड.हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे,कुमार गायकवाड,गणेश कारंडे,अनिल वीर आदी संविधान प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

       निंदाजनक ठाराव मंजूर करून मुख्यमंत्र्यानी केंद्राकडे सादर करावा. अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा.अशीही मागणी करण्यात आली.अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीने जाण्यात आले.यावेळी संविधानप्रेमींनी जिल्हाधिकारी यांच्याकरवी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.दरम्यान, येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ देशाचे गृहमंत्री ना.अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्धल बेताल वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करून आंदोलन छेडण्यात आले होते.तेव्हा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त