पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

पुसेगाव : महाराष्ट्र कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तर व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने 31 डिसेंबर रोजी साडेनऊ वाजता जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती 108 श्री महंत सुंदरगिरीजी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज मधील इच्छुक कलावंत स्पर्धकांना व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्ट ने सलग अकराव्या वर्षी यात्रा स्थळावर युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये लोक नृत्य, रेकॉर्ड डान्स,पथनाट्य, सुगमगायन, समूहगीत आदी घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील तीन विजेत्या क्रमांकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे.

     येणाऱ्या सर्व स्पर्धकांना नियमाप्रमाणे प्रवास खर्च जेवण व नाश्ता ट्रस्टमार्फत दिला जाईल, लोक नृत्य रेकॉर्ड डान्स साठी लोक नृत्य लाईव्ह ची नियमावली बंधनकारक राहील, परीक्षकाचा निर्णय अंतिम राहील,सर्व स्पर्धकांना मोफत प्रवेश दिला जाईल. नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत केले जाईल महोत्सवासाठी देवस्थान ट्रस्टच्या नियम अटीबंधन करत राहतील हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारा असून विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रस्ट ने युवा कलाकारांना एक व्यासपीठ मध्यम तयार करून दिले आहे. शाळा कॉलेज महाविद्यालयीन इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्त रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव, संतोष वाघ,गौरव जाधव सचिन देशमुख यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त