हरळीतील घरफोडीचा गुन्हा उघड; खंडाळा पोलिसांकडून चार संशयितांना अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
Satara News Team
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज नेटवर्क | खंडाळा: खंडाळा तालुक्यातील हरळी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा खंडाळा पोलिसांनी उघडकीस आणला असून, या प्रकरणात दोन महिला आणि दोन पुरुष अशा चार संशयितांना ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच जेजुरी आणि फुरसुंगी परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचाही तपास पुढे आला आहे.
हरळी, ता. खंडाळा येथील सौरभ राजेंद्र शिंदे यांच्या पोल्ट्री फार्मच्या कंपाऊंडची तार तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. तेथून सुमारे १५० मीटर कॉपर केबल, औषध फवारणीचा एसटीपी पंप, १०० फुटांचे दोन पाण्याचे पाइप, पान्हे, चटई आदी साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून माहि
गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून माहिती घेत तसेच गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच दोन मोटारसायकली चोरी केल्याची माहिती समोर आली. यामध्ये होंडा स्प्लेंडर आणि स्प्लेंडर मोटारसायकलचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जेजुरी पोलिस स्टेशन व फुरसुंगी पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांबाबतही तपास सुरू आहे.
या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
उमेश गोपाल पाटील (वय ३४) – कोथळेवाडी, सातारा
साक्षी संजय तांगडे (वय २१) – केदारेश्वर मंदिर परिसर, शिरवळ
तेजल करण पवार (वय २०) – पंढरपूर फाटा, शिरवळ
राहुल रावसो जाधव (वय २१) – वार्ड क्रमांक ३, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत पोलीस कर्मचारी नितीन म्हांगरे, दत्ता दिघे, सी.एस. धापते व एस.बी. जाधव यांनी सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 26th Nov 2026 06:59 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 26th Nov 2026 06:59 pm











