क्षेत्र महाबळेश्वर ते किल्ले प्रतापगड रोपवेसाठी तातडीने कार्यवाही करावी..

खा.श्री.छ.उदयनराजे यांची मागणी

नवी दिल्ली : प्रतापगड प्राधिकरण स्थापन केल्यानंतर धोम धरण ते क्षेत्र महाबळेश्वर ते किल्ले प्रतापगड असा दोन टप्प्यात रोप वे उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र त्वरित देण्या संबंधी  कार्यवाही करावी.अशी मागणी खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दिल्ली येथे खा.उदयनराजे याच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची भेट घेतली तेंव्हा खा.श्री.छ.उदयनराजे यांनी   महाराष्ट्राच्या विकास संदर्भात त्यांच्याकडे  विविध मागण्या केल्या.तसेच राज्य सरकारने या मागण्या संदर्भात पाठपूरावा करावा असे ही नमूद केले.

या मागण्यांमध्ये त्यांनी,
 सुरूर पोलादपूर रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्या संबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या कडे दाखल केला असून त्या प्रस्तावाच्या संबंधित महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करून मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.अशी आग्रही मागणी केली.

 शिव स्वराज्य सर्किट स्थापन महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.त्याची कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यटन व संस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा करावा व त्यासंबंधी संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे.
 
या शिवाय सातारा शहर आणि तालुका पोलिस स्टेशनसाठी  नवीन इमारत मंजूर करावी, जिहे कटापूर प्रकल्पासाठी तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने त्वरित द्यावी, या मागण्यांसह  महाबळेश्वर तालुक्यात मौजे सोळशी येथे 5.5 ते 6 टीएमसी धरण प्रकल्पास  राज्य शासनाने त्वरित मान्यता द्यावी.यामुळे  सातारा जिल्ह्यातील सातारा, खंडाळा, वाई, खटाव, कोरेगाव, फलटण, माण या तालुक्यातील अधिकचे क्षेत्र ओलिताखाली येईल, व या तालुक्यातील शेतकर्‍यांना याचा लाभ होईल असे सांगून पूर परिस्थितीत या धरणात साठा केल्यास कोयना धरणाच्या लाभ क्षेत्रातील अतिरिक्त पाणी साठा केल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल असे ही फडणवीस याच्याकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त