छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना
मुंबई व कारगिलमधील दहशतवादी हल्ल्याचे प्रात्यक्षिके सादर,कॉलेज झाले युद्धभूमीकोमल वाघ पवार
- Sat 28th Jan 2023 12:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये रोमहर्षक युद्ध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे आरोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिनियर अंडर ऑफिसर किशोर पंडित, प्रियंका चव्हाण, ज्युनियर अंडर ऑफिसर अनिकेत ननवरे, मानसी जाधव, सार्जंट प्रज्वल निकम व अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली छात्र सैनिकांनी मार्च पास संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.त्यानंतर छात्र सैनिकांनी फूट ड्रिल व रायफल ड्रिल डेमो सादर करून सैनिकी शिस्तीचे प्रदर्शन केले. लेफ्टनंट प्रा.केशव पवार, ट्रेनिंग केअर टेकर वैभव भोसले, विशाल सनदी यांच्या नेतृत्वाखाली 26 /11 ला झालेल्या मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्याला भारतीय सैन्य दलाच्या सुरक्षा कमांडोंनी कसे चोख उत्तर दिले याचे रोमांचकारी प्रदर्शन सादर करून प्रेक्षकांच्या मनातात राष्ट्र प्रेम आणि सैनिकांच्या प्रती आदराची भावना निर्माण करण्यात आली. कॉलेजमध्ये साक्षात युद्ध चालू असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्याचबरोबर एन.सी.सी प्रथम वर्षाच्या मुलींनी व पोलीस भरती अकॅडमीच्या मुलींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. विठ्ठल शिवणकर उपस्थितांना संबोधित केले. शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून नवीन पिढीने संविधानातील समतेचा प्रकाश होऊन भारताला सुजलाम सुफलाम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सैन्य दलात निवड झालेल्या एन.सी.सी. च्या दहा कॅडेट्स व विशेष क्रीडा खेळाडूंचे सत्कार करून त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रोशनआरा शेख , डॉ. रामराजे मानेदेशमुख, प्रा.डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. सुभाष कारंडे, डॉ. सविता मेनकुदळे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यानी उपस्थित राहून विद्यार्थांचे कौतुक केले. या वेळी राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या राजवेध या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे प्रकाशन देखील प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले. कमवा आणि शिका योजनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रसवंतीगृह उद्घाटन महाविद्यालयात करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक सादरीकरण यशस्वी करण्यासाठी सार्जंट ओंकार करंदकर, प्रथमेश दुर्गुळे ,समीर शिंदे, गायत्री भिलारे, सोनाली कदम, प्रियंका जायगूडे, प्राची जगताप, साक्षी शिंदे, निकिता कणसे, अंजली प्रजापत यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यकर्माच्या उत्तम सादरीकरणासाठी विक्रम घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.लेफ्टनंट केशव पवार,प्रा.विक्रम ननावरे तसेच एन.सी.सी विभाग,क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग इत्यादी विभागानी समन्वयाने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले.






स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 28th Jan 2023 12:15 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 28th Jan 2023 12:15 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 28th Jan 2023 12:15 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 28th Jan 2023 12:15 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 28th Jan 2023 12:15 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 28th Jan 2023 12:15 pm





