जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे

बांधकाम उत्तर विभागाकडून आचारसंहिता भंग : गणेश अहिवळे यांची तक्रार

शाहूपुरी : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असताना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य आणि मागील इमारतीमध्ये चक्क दुरुस्तीची कामे सुरू आहेत .ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत सुरू असून त्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी केला आहे .

  

यासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्त महेश पुलकुंडवार वजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडे तक्रार केली आहे .याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आली असून या प्रकरणावर येत्या 26 जानेवारी रोजी आईवळे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे .आचारसंहिता सुरू असताना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य दालनांमध्ये चक्क दुरुस्तीची कामे निघावीत याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात होते .ही कामे आचारसंहितापूर्वकाळातली असल्याचे काही जणांचे म्हणणे असले तरी त्याबाबतचा कार्यादेश बांधकाम उत्तर विभागाने उपलब्ध केलेला नाही तसेच या कामांना प्रशासकीय मान्यता नसल्याचा आरोप अहिवळे यांनी केला आहे .या नियमबाह्य कामांची तक्रार झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे .



या निवेदनात नमूद आहे की मोदी यांनी ऑनलाइन वाटप मीटिंगच्या प्रत्येक तालुक्यातील कामाच्या बोगस याद्या करून कामाचे प्रत्यक्ष वाटप केले नाही ही कामे मर्जीतल्या ठेकेदारांना विकून करोडो रुपये कमवण्यात आल्याचा आरोप आहे जिल्हा परिषदेमध्ये नव्या ठेकेदारांच्या नोंदणीसाठी सुद्धा पैसे गोळा केले जातात असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे ग्राम विकास विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी अहिवळे यांनी केली आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला