सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
प्रकाश शिंदे- Fri 19th Dec 2025 12:55 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ (ब) साठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार निलेश सुभाष मोरे यांनी दाखल केली असून, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, धमकावणे, हिंसाचार तसेच आदर्श आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनामुळे सदर निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही याचिका अॅड. तृणाल टोणपे, अॅड. निकिता आनंदाचे, अॅड. गौतम कुलकर्णी, अॅड. अनिरुद्ध रोटे, वैभव राऊत आणि रोहिणी सिदाम यांच्यामार्फत दाखल करण्यात आली असून, याचिकेनुसार, प्रतिवादी विजय शिवाजी देसाई (भाजप उमेदवार) व त्यांच्या समर्थकांच्या कृत्यांमुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली. मतदानाच्या दिवशी धंदे प्रशिक्षण केंद्र (ITI) मतदान केंद्र व रिमांड होम मतदान केंद्रासह विविध ठिकाणी मतदार मतदान केंद्रात भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेले चिठ्या बेकायदेशीररीत्या घेऊन जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत याचिकाकर्त्यांच्या मतदान प्रतिनिधींनी वारंवार हरकती घेतल्या असतानाही, अनेक बूथ प्रमुखांनी त्या हरकती नोंदविल्या नाहीत किंवा कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही, असा आरोप आहे.
याचिकेत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की भाजप समर्थक मतदान केंद्रात मुक्तपणे ये-जा करत होते, तसेच वडापाव, सँडविच, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या अन्नपदार्थांचे वाटप करत होते. हे सर्व राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याचिकेत एका गंभीर हिंसाचाराच्या घटनेचाही उल्लेख आहे. याचिकाकर्त्यांचे समर्थक महेश शिवदास यांना रिमांड होम मतदान केंद्राजवळील प्रतिबंधित १०० मीटर परिसरात धमकावण्यात आले, जातीय शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि सुमारे ४० ते ५० लोकांनी त्यांना घेरल्याचा आरोप आहे, तरीही संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
याचिकेनुसार, व्हिडिओ पुरावे, वैद्यकीय तपासणी अहवाल, प्रसारमाध्यमांतील बातम्या आणि वारंवार दिलेल्या तक्रारी असूनही, राजकीय दबावामुळे पोलिसांना एफआयआर नोंदविण्यात अपयश आले. मतदानाच्या दिवशी याचिकाकर्ते व त्यांचे समर्थक यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनेक तास आंदोलन केले, मात्र त्यानंतरही कोणतीही प्रभावी कायदेशीर कारवाई झाली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप केले असून, बूथ प्रमुख व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना बेकायदेशीर कृत्ये थांबविण्यात अपयश आले, पोलिसांची मदत मागविण्यास नकार दिला आणि त्याच दिवशी सादर केलेल्या लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद केले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, १९६५, आदर्श आचारसंहिता अंतर्गत विविध तरतुदींच्या उल्लंघनाचा आधार घेत, प्रभाग क्रमांक ५ (ब) मधील निवडणूक अवैध ठरवून ती रद्द करावी व सदर प्रभागासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या आगामी सुनावणीकडे राजकीय व कायदेशीर वर्तुळाचे विशेष लक्ष लागलेले आहे.
"याचिकाकर्ते निलेश मोरे यांनी सांगितले की त्यांनी सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, सातारा यांना पत्र पाठवून घटनेबाबत स्वयं स्पष्ट व सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर प्रकरणाबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचेही याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले."
Your Case is Filed. Stamp/Lodging No. is WP/31657/2025.
BOMBHC-Bombay High Court
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
संबंधित बातम्या
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
आपला हक्काचा माणूस म्हणून पाठीशी रहा : शरद काटकर
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे.
- Fri 19th Dec 2025 12:55 pm
-
अधिकृत उमेदवाराशिवाय कोणीही भाजप नेत्यांचे फोटो वापरू नये...आढळल्यास कारवाई...अतुल भोसले.
- Fri 19th Dec 2025 12:55 pm










