जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी अमोल मोहिते, व्हाईस चेअरमनपदी विजय बडेकर बिनविरोध
- अमित वाघमारे
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जनता सहकारी बँक लि., साताराच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीकरीता शुक्रवारी अध्यासी अधिकारी अनुराधा पंडीतराव यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये चेअरमनपदासाठी अमोल उदयसिंह मोहिते, व्हाईस चेअरमनपदासाठी विजय दिनकर बडेकर यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अमोल मोहिते यांची बँकेच्या चेअरमन पदी तर विजय बडेकर यांची बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी अनुराधा पंडीतराव यांनी जाहीर केले. प्रारंभीअध्यासी अधिकारी पंडीतराव यांचे स्वागत भागधारक पॅनेल प्रमुख, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांनी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिते यांचे स्वागत जेष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी विनोद कुलकर्णी यांनी नूतन चेअरमन अमोल मोहिते यांचा तर जेष्ठ संचालक जयवंत भोसले यांनी नूतन व्हाईस चेअरमन विजय बडेकर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी विनोद कुलकर्णी यांनी भागधारक पॅनेल हे सलग दुस-यांदा २१/० फरकाने विजयी झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा पुष्पगुच्छ व पेढे देवून यथोचित सत्कार केला. नवनिर्वाचित संचालक मंडळ पूर्वीप्रमाणेच बँकेचा सर्व कारभार पारदर्शकपणे करेल याची ग्वाही दिली. २०११ पासून संचालक मंडळाने कोणताही भत्ता घेतलेला नसून पुढील ५ वर्षातही संचालक मंडळ कोणत्याही स्वरूपात भत्ता स्वीकरणार नाही, असे जाहीर केले. तसेच बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांप्रमाणे एफ.एस.डब्ल्यू. एम. चे सर्व निकष पूर्तता करून पुढील वर्षी सभासदांना निश्चित लाभांश देईल असा विश्वास व्यक्त केला.
नूतन चेअरमन अमोल मोहिते यांनी सर्व संचालकांच्या सहकार्याने बँकेचा कारभार गतिमान होईल. ठेव, कर्ज व्यवसायात भरघोस वाढ, बँकेचा जिल्हयाबाहेर शाखा विस्तार करून बँकेची चौफेर प्रगती करू, असा विश्वास व्यक्त करून बँकेची सध्याची आर्थिक आकडेवारी पाहता पुढील वर्षी सभासदांना कोणत्याही परिस्थितीत लाभांश देऊ असा विश्वास व्यक्त केला आणि सर्वांचे आभार मानले. व्हाईस चेअरमन विजय बडेकर यांनी याप्रसंगी त्यांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे, सर्व संचालकांचे आभार मानले. बँकेच्या ३१ मार्चअखेर १२२ कोटी ७६ लाख एवढया ठेवी होत्या, त्यामध्ये मागील ३ महिन्यात २ कोटी २५ लाखांनी वाढ होवून आजमितीस एकूण ठेवी १२४ कोटी ५० लाख एवढ्या झालेल्या आहेत. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकारी दत्तात्रय मोहिते यांची सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सातारा जिल्हा (अतिरिक्त पदभार) पदी नियुक्ती झाली, त्यानिमित्ताने बँकेचे जेष्ठ संचालक आनंदराव कणसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बँकेचे नवनिर्वाचित संचालक अशोक मोने, माधव सारडा, चंद्रशेखर घोडके (सराफ), वसंतराव लेवे, अविनाश बाचल, रामचंद्र साठे, रविंद्र माने, वजीर नदाफ, नारायण लोहार, मच्छद्रिं जगदाळे, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, डॉ. चेतना माजगांवकर, सुजाता राजेमहाडीक, बाळासाहेब गोसावी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, सर्व अधिकारी आणि सेवक वर्ग उपस्थित होता.
स्थानिक बातम्या
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
संबंधित बातम्या
-
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Fri 7th Jul 2023 10:06 pm
-
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Fri 7th Jul 2023 10:06 pm