बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

खातेदारांना दमदाटीची भाषा

शिवथर.:  वडूथ तालुका सातारा येथे गेले किती वर्ष बँक ऑफ इंडिया शाखा वडुथ कार्यरत असून हजारो खातेदार या बँकेचे आहेत या बँकेमधून लाखो रुपये ची उलाढाल होत असते ही शाखा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शिवथर आरफळ वडूथ आरळे बोरखळ मालगाव या ठिकाणाहून लोक बँकेमध्ये येत असतात त्यामध्ये पेन्शनधारक तसेच व्यावसायिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या बँकेमध्ये उलाढाल करत असतो परंतु या बँकेतील कर्मचारी खातेदारांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत त्यामुळे ग्राहकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या 


 वडुथ तालुका सातारा या ठिकाणी बँक ऑफ इंडिया येथील कर्मचारी ग्राहकांना सर्विस व्यवस्थित देत नाहीत तसेच एखाद्या वयस्कर व्यक्तीला पैसे काढण्याची स्लिप देखील भरून देत नाहीत जर एखादी स्लिप चुकले तर अरे रावेची भाषा करत असतात तसेच सन 2017- 18 साली काढलेले कर्ज भरलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी थकीत दाखवले जात आहे अशी शेकडो खातेदारांची तक्रार आहे त्याचे कारण लाडकी बहीण योजनेचे आलेले पैसे महिलावर्ग काढण्यासाठी गेले असता मागील बँकेचे काही देणे घेणे नसताना सुद्धा त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत याची माहिती अधिकाऱ्यांना विचारले असता आम्हाला काही माहीत नाही अशी बतावणी करून चालढकल केली जाते कोणताही योग्य सल्ला बँकेचे अधिकाऱ्यांच्या कडून दिला जात नसल्याने खातेदार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत याबाबत कोणाकडे दाद मागायची असाही सवाल उपस्थित केला जात आहे. बऱ्याचदा खातेदारांनी केवायसी दाखल करून सुद्धा 15 दिवस पैसे मिळणार नाहीत तुम्ही परत या असाही सवाल केला जात आहे पंधरा दिवसानंतर बँकेमध्ये गेल्यावर दोन दोन तास लाईन मध्ये उभे राहून कॅशियरच्या केबिन जवळ गेल्यावर कॅशियर कडून पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची सूचना केली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून देखील योग्य ते सल्ला मिळत नसल्याने पुन्हा खातेदारांना हेलपाटे मारल्याशिवाय पर्याय उरला नाही याबाबत दखल कोणाकडे मागायची असाही सवाल उपस्थित केला जात आहेतरी वडूथ येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यावी अशी मागणी खातेदारांच्या कडून होत आहे 

थकीत कर्ज भरलेले आहे परंतु त्याची इंट्री होत नाही आम्ही त्याला काही करू शकत नाही 

 एस बी भोसले बँक अधिकारी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त