255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज

फलटण : महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या 228 जागा करता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रमानुसार उद्या फलटण मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार उद्या दिनांक 20. 11. 2024. वार बुधवार रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांनी सर्व शासकीय यंत्रणा सुसज्ज केली आहे . 

 या मतदारसंघात एकूण 355 मतदान केंद्रे असून त्यापैकी ग्रामीण भागात 308 मतदान केंद्र तर शहरी भागात 47 मतदान केंद्र आहेत. ग्रामीण मतदान केंद्र इमारती एकूण 182 असून शहरी मतदान केंद्र इमारती 21 आहेत असे एकूण 203 मतदान केंद्र इमारतींची संख्या आहे. फलटण मतदारसंघातील वयोमान परत्वे मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मतदारांसाठी शासकीय यंत्रणेनुसार सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मुख्यतः मतदार चीठी, विद्युत जोडणी तसेच महिला पुरुष दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प पण उपलब्ध असणार आहेत तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असून महिला व पुरुष मतदानासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची पण सोय असणार आहे मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मंडपाची व्यवस्था तसेच पाळणाघराची पण व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करून प्रथमोपचार व्यवस्था तसेच मतदारांसाठी मदत केंद्र उपलब्ध असणार आहे 


मतदारांची रांग मोठी झाल्यास मतदारसाठी बैठकीचे बाक पण उपलब्ध असतील. तसेच 230 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध केली आहे. 355 बूथ लक्षात घेता 2500 कर्मचारी बेचाळीस सेक्टर अधिकारी कार्यरत असून 69 वाहने सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत. मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा असून. मतदान शांततेत व सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे असे. फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस साहेब यांनी सांगितले. फलटण मतदार संघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी 23 पोलीस अधिकारी सह 316 पोलीस. 

 तसेच 319 होमगार्ड. केंद्रीय लष्कराची आयटीबीपी कंपनीची एक कंपनी तीन अधिकाऱ्यांसह 89 कर्मचारी. एस आर पी एफ चे एक पलटून एक अधिकारी सह25 पंचवीस कर्मचारी असा सुसज्ज बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये फलटण शहर सह इतर गावांना हेमंत कुमार शहा पीआय. ग्रामीण भागासाठी सुनील महाडिक पी आय आणि त्यांच्या मदतीला श्री नलवडे एपीआय. तसेच लोणंद पोलीस स्टेशनचे सुशील भोसले एपीआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण मतदार संघात शांततेत आणि सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वच मतदारांनी सहकार्य करावे.

 असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री सचिन ढोले पाटील साहेब आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. राहुल धस साहेब यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त