शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
Satara News Team
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
- बातमी शेयर करा

सातारा : वाई येथे गद्दारांना पाडा, असे खासदार शरद पवार म्हणाले होते. परंतु, सत्ता असल्यापासून गेली साठ वर्षे केवळ त्यांनी व काँग्रेसने घोषणाच केल्या. लोकांची कामे केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले, याच्यापेक्षा मोठी गद्दारी होवू शकत नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली. सातारा येथे अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रांवर खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदयनराजे म्हणाले, विनोद तावडे यांचे चारित्रहनन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. एखाद्या रूममध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळे नियोजित आहे. राजकारणात अनेक वर्षांपासून असले प्रकार सुरूच आहेत. लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा, असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचण्याचे काम केले. त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य झाले पाहिजे. परंतु, स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने फक्त अनेक घोषणा केल्या. घोषणा फक्त मते मिळवण्यासाठीच होत्या. त्यांच्या ६० वर्षाच्या काळात कोणतीही कामे झाली नाहीत की चांगली धोरणे राबवली गेली नाहीत. परंतु, लोकांना प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे. हाताचा पंजा सत्ता असताना काही करू शकला नाही.
तुतारीने केवळ पोकळ घोषणांचा गाजावाजा केला जात आहे. मशालवाल्यांना तर त्यांनी काय काम केलंय ते मशाल घेवून शोधावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
युगेंद्र पवार परदेशात राहतात
बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार उभे आहेत. युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले आहे. त्यांनी तसंच रहावं. ज्यावेळी काम करायचे होते त्यावेळी केले नाही. आता निवडणुकीच्या काळात हौशे नवशे गवशे असतात. त्यांना बळीचा बकरा केला असल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.
#satara
स्थानिक बातम्या
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
संबंधित बातम्या
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी जाहीर;जाधव,पवार यांना संधी
- Wed 20th Nov 2024 01:37 pm
-
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Wed 20th Nov 2024 01:37 pm