मनोजदादा हे सख्खे भाऊ तर तुतारीवाले सावत्र भाऊ

विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी घेतला समाचार

देशमुखनगर : आपल्याला पंधराशे रुपये मिळणार म्हटल्यावर यांना तुतारीवाल्यांना पोटाचे त्रास सुरू झाले एक एकजण तरकोर्टात गेला. योजना बंद करा म्हणाले. मात्र आमच्या तीन भाऊंनी लाडक्या बहिणींच्या पैशांची अधिच तरतूद करून ठेवली आहे. म्हणून आता आपली लढाई चोरांविरोधात आहे. आपली लढाई खोटारड्या लोकांबरोबर आहे. 25 वर्षे उत्तर कराडला आमदार राहुन, मंत्री राहूनही कामे केली नाहीत लोकांची ही मजबुरी होती. लोकांकडे पर्याय नव्हता पण आता मनोज दादांच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध झाला आहे. मनोजदादाच आपला सख्खा भाऊ आहे त्यांना निवडून आणा असे आवाहन विधान परिषद आमदार चित्राताई वाघ यांनी केले. उंब्रज ता. कराड येथे मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

  यावेळी रहिमतपूरच्या चित्रलेखा माने कदम, समता घोरपडे, तेजस्विनी घोरपडे, दिपाली खोत, सिमाताई घार्गे, अंजली जाधव, मीनाक्षी पोळ, उंब्रजच्या उपसरपंच सुनंदा जाधव, प्रतिभा कांबळे, वैशाली मांढरे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, महिलांना पैसे येतात ते संसारासाठी खर्च होतात. पण आपल्या जसे सख्खी भाऊ जसे असतात तसे सावत्र भाऊ ही असतात. महाविकास आघाडी म्हणजे आपले सावत्र भाऊ आहेत. लाडकी बहिण योजना आल्यावर तुतारी वाल्या मोठ्या ताई सुप्रिया सुळे म्हणाल्या महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत. मात्र तीन भाऊंनी बहिणींच्या खात्यात पैसे देण्याची तरतूद आधीच केली आहे. याच बारामतीच्या सुप्रियाताई सुळे यांनी दहा एकरात 100 कोटीची वांगी लावली. आज तुतारी वाली या ताई सांगते आम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार बहुतेक या दहा एकरातील वांग्यातूनच देणार अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. 

तसेच बारामतीची ताईकुठले बियाणे वापरते ज्या बियाणाने 10 एकरात 100 कोटी वांगी पिकतात ते बियाणी तरी पाठव असा टोला चित्राताई वाघ यांनी लगावला. हे खोटारडे लोक आहेत यांना तुमच्या सुखदुःखाशी काहीही घेणे देणे नाही. तुतारीचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ही महाराष्ट्रवर आलेली नामुष्की आहे. आपल्या सुखाच्या आड येणारी लोक तुतारी सोबत आहेत. म्हणून आज महायुतीच्या सोबत राहणे गरजेचे आहे. आपल्या सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा, मुलींना सरकार मोफत शिक्षण देत आहे. महिलांसाठी अनेक योजना महायुती सरकारने आणल्या. यावेळी बोलताना चित्रलेखा माने कदम म्हणाल्या, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेकदा तिरंगी लढती झाल्या त्यामुळे परिवर्तन होऊ शकले नाही. परंतु 2024 च्या या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर दुरंगी लढत होत असून मनोज दादा घोरपडे यांना जो पाठिंबा मिळत आहे तो विजयाचा गुलाल आहे. त्यांच्या पाठीशी सर्व माता भगिनींनी ठामपणे उभे राहून येणाऱ्या दहा दिवसात घराघरात कमळ चिन्ह पोचवावे असे आवाहन केले. यावेळी तेजस्विनी घोरपडे व अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त