पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कराड : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर असताना ठाणे गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. तांबवे (ता. कराड) येथील एका संशयिताकडून पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. तांबवेतील कोयना नदीवरील पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सौरभ मधुकर कांबळे (रा. साजूर ता. कराड) असं संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक महिती अशी की, समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक यांनी विधानसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि सुधीर पाटील व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते.  

मौजे तांबवे ता. कराड गांवचे हद्दीत एक इसम पिस्टल घेवून संशयीत रित्त्या फिरत असलेबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी सुचना देवून सदर परिसरात पेट्रोलींग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.


 दिनांक १७/११/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने तांबवे ता. कराड परिसरात पेट्रोलिंग करीत फिरत असताना मिळाले बातमी मधील वर्णनाप्रमाणे एक युवक तांबवे गांवातील कोयना नदीचे पुलाजवळ थांबलेला दिसला पथकास शंका आलेने त्याला जागीच पकडून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे कब्जात १ देशी बनावटीची पिस्टल, व १ जिवंत काडतूस, असा एकुण रू.७५२००/- चा मुद्देमाल ताब्यात मिळून आलेने सदर युवकाविरुध्द कराड तालुका पोलीस ठाणेत शस्त्रबंदी व महाराष्ट्र पोलीस अधिनियम या कायद्यांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपावेतो ९८ देशी बनावटीची पिस्टल, ४ बारा बोअर बंदूक, २ रायफल, २२५ जिवंत काडतुसे, व ३८३ रिकाम्या पुंगळवा, ४ मॅग्झीन असे जप्त करण्यात आलेले आहेत. सदर कारवाईमध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, पो.हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, हसन तडवी, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, मनोज जाधव, धिरज महाडीक, वैभव सावंत चालक अमृत करपे तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील पोउनि सचिन भिलारी व पो. हवा समिर कदम यांनी सहभाग घेतला. या केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अतुल सबनीस, पोलीस उप-अधीक्षक, (गृह) सातारा यांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त