बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांची टोळी दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार

 देशमुख नगर,  : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची विक्री तसेच इतर गुन्हे करणाऱ्या टोळीप्रमुख शकीला गुलाब मुलांनी (वय ६०) सह तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला.या प्रस्तावाची चौकशी सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केली.

बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूची चोरटी विक्री करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे इत्यादी गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल होते. सहायक पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करणे बाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांना सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी केली.

टोळीतील इसमांना प्रतिबंधात्मक कारवाई तसेच वारंवार सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचे सातत्याने गुन्ह्याचे सत्र सुरूच होते, त्यांच्यावर कोणाचाच धाक न राहिल्याने लोकांना फार मोठा उपद्रव होत होता. त्यामुळे वरील टोळीस हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सुनावणी दरम्यान कलम 55 नुसार सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले.

नोव्हेंबर 2022 पासून 18 उपद्रवी टोळ्यांमधील 61 जणांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यात सर्वच गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी, एमपीडीए अशा कठोर कारवाया होणार असल्याचे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टोळी प्रमुख शकीला गुलाब मुलाणी वय 60, अमीर गुलाब मुलाणी वय 37, समीर गुलाब मुलाणी वय 33 सर्व रा. देशमुख नगर, तालुका जिल्हा सातारा या तिघांना दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून बाहेर करण्यात आले आहे.

हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दादा स्वामी, प्रशांत चव्हाण, विशाल जाधव यांनी योग्य तो पुरावा सादर करून सहकार्य केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त