एसपीसाहेब कायद्याला न जुमानणाऱ्या 'समीर'ला मोक्का लावाच!

सातारा : मटका किंग समीर कच्छी याला कायद्याचा धाक राहिला नसून तडिपारीसारख्या कारवाया होऊन देखील समीर कच्छीच्या वागणुकीत सुधारणा होताना दिसून येत नाही. तीन दिवसांपूर्वी एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी मटका किंग समीर कच्छी सह दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोमवार दि.३ रोजी रात्री दहा वाजता सोहेल इकबाल बागवान (रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) याने मटका किंग समीर कच्छी रा. यश ढाब्याच्या पाठीमागे, सातारा याच्याकडून चार लाख रुपये उसने घेतले होते. त्यावरून समीर कच्छी आणि राहुल निंबाळकर रा. कोंडवे, ता. सातारा या दोघांनी बागवान यास हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि कोयता पाठीत मारून जखमी केले. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत. याप्रकरणी संबंधितांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत. संबंधितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मटका किंग समीर कच्छी सह त्याच्या गँगच्या उच्छादाने संपूर्ण जिल्हा त्रासला आहे. याची पाळेमुळे अगदी गोव्यापर्यंत विस्तारली असल्याचे एका कारवाईत समोर आलेच आहे. त्याच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा दिवटाही या धंद्याकडे वळला असून तोही पैशाच्या कैफात असल्याचे दिसून येते. दोन-तीन महिन्यांपूर्वीच एकाला घरात घुसून मारहाण, दमदाटी प्रकरणी समीर कच्छीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

मात्र, कितीही गुन्हे दाखल झाले तरी समीर कच्छी उर्फ शेठ उर्फ टकल्या हा पोलिसांना घाबरत नसल्याचेच समोर येत आहे. एक गुन्हा दाखल झाला की हा दुसरा गुन्हा करण्यास तयार होतो. कारण कलमेच त्या पद्धतीची त्याच्यावर लावण्यात येतात. जेणेकरुन तो मोठ्या कचाट्यात सापडायला नको. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा कोणताच अंकुश राहिलेला नाही. काहीच शेरदिल अधिकारी त्याच्या बखोटीला धरुन त्याला पोलिसी हिसका दाखवतात. मात्र ते काहीच. तसे पहायला गेले तर मटका किंग समीर कच्छी ने आपल्या अवैध धंद्यांच्या साम्राज्याचा विस्तार सातारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातही केला आहे, हे त्याचा सीडीआर काढला तर कोणाच्याही लक्षात येईल. पण इतक्या खोलात जाण्यासाठी पोलिसांच्या तशा मानसिकतेची गरज आहे. पण सातारा शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखायची असेल तर समीर कच्छीसह त्याच्या साथीदारांला पुन्हा एकदा मोक्का दाखवण्याची नितांत गरज असल्याचेच दिसून येते.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त