कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?

सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे “ऑपरेशन टायगर” वेगाने सुरू असून, त्याचा प्रभाव राज्यभरात जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले अ‍ॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर हे माजी मंत्री स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांचे पुत्र असून, त्यांच्या या राजकीय निर्णयाने साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, विशेषतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही स्थिती आव्हानात्मक ठरू शकते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, उदयसिंह पाटील यांनी त्यांच्या निवडक प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता, अनेक कार्यकर्त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करण्याची शिफारस केली. तसेच, त्यांच्या प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अ‍ॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक बळकट होणार असून, आगामी राजकीय घडामोडींवर त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. 

कोण आहेत अ‍ॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर ? 

अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे सातारा जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. ते माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र आहेत. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नोव्हेंबर २०२० मध्ये, उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली, आणि स्थानिक राजकारणात नवीन दिशा मिळाली.नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत, उदयसिंह पाटील यांनी कऱ्हाड सोसायटी गटातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या या राजकीय प्रवासामुळे आणि त्यांच्या निर्णयांमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त