घरफोडीच्या आरोपींना 2 तासात अटक करुन 60 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
कुलदीप मोहिते
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
- बातमी शेयर करा

उंब्रज : कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीस केलेला सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तिघा आरोपीना देखील ताब्यात घेतले आहे. रणजीत सोमनाथ चव्हाण (वय 22), संकेत संतोष चव्हाण (वय 19), अमोल रमेश चव्हाण (वय 19, सर्व राहणार लक्ष्मी नगर उंब्रज, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ०२/०३/२०२५ रोजीच्या रात्री ७.०० वाजता ते दिनांक ०३/०३/२०२५ रोजीच्या सकाळी ९.०० वाजता या दरम्यान मौजे कळंत्रेवाडी येथील सिध्दीविनायक ट्रान्सपोर्ट गोडावूनमधून MRF कंपनीचे भारत बेंज ट्रकचे रबराचे ६० हजार रुपये किंमतीचे चार टायर चोरले गेले. या प्रकरणात उंब्रज पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आणि तात्काळ कारवाई सुरू केली. पोलीस सहायक निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफने पेट्रोलींग करीत उंब्रज गावाच्या हद्दीत तीन संशयितांना पकडले. त्यांची ओळख रणजित सोमनाथ चव्हाण, संकेत संतोष चव्हाण आणि अमोल रमेश चव्हाण अशी आहे. हे सर्व संशयित लक्ष्मीनगर, उंब्रज येथील रहिवाशी असून त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले हे करत आहेत.
या कारवाईत पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर आणि पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. मयूर थोरात, पो. कॉ पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ. प्रशांत पवार यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
संबंधित बातम्या
-
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
-
दुर्लक्षित औंध पोलिस ठाण्यावर एसपी साहेबांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
-
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
-
वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
-
एसपीसाहेब कायद्याला न जुमानणाऱ्या 'समीर'ला मोक्का लावाच!
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
-
स्टाफ रूममध्ये बोलावून शिक्षकाचे केले विद्यार्थिनीशी अश्लील चाळे
- Wed 5th Mar 2025 07:02 pm
-
लिंक लाइकचा फंडा, एकवीस लाखांना गंडा
- Wed 5th Mar 2025 07:02 pm