2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
Satara News Team
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. याच सर्व आरोपांच्या, घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली.
2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता. आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार जयकुमार यांनी केला. माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले.या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे,
आणि या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे, त्या प्रत्येकावर सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं, त्या लोकांना कोर्टात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायलय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( 2019) आता सहा वर्ष झाली आहेत. आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा, याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटत. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाने, ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोतचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही.
एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं हे मला अपेक्षित नव्हतं.
या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे, आणि या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे, त्या प्रत्येकावर सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं, त्या लोकांना कोर्टात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
संबंधित बातम्या
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
आपला हक्काचा माणूस म्हणून पाठीशी रहा : शरद काटकर
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे.
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
अधिकृत उमेदवाराशिवाय कोणीही भाजप नेत्यांचे फोटो वापरू नये...आढळल्यास कारवाई...अतुल भोसले.
- Wed 5th Mar 2025 01:37 pm
-
धार्मिक जातीय सलोखा व ऐक्य हेच माझे वचन : कुमार शिंदे
- Wed 5th Mar 2025 01:37 pm











