लक्ष्मण माने यांचे एकदिवसीय उपोषण संपन्न

सातारा : राष्ट्रद्रोही सावरकरांचा तसेच त्यांची खोटी प्रतिमा उभी करणाऱ्या सनातनी सत्तापिपासूंचा जाहीर निषेध करण्यासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.
                 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लक्ष्मण माने व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माणिक आढाव,गणेश कारंडे, विशाल भोसले,अनिल वीर, बी.एल.माने,गौरव माळी आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरानी भेटी देऊन जाहीर पाठींबा दिला.
          "सावरकरांनी 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथात छत्रपती शिवरायांबाबत अस्लाघ्य लेखन केले आहे. निदान छत्रपतींच्या वारसदारांनी या ग्रंथातील काही मजकूर वाचला पाहिजे. गोरे असो की अन्य कोणी बहुजन समाजातील आमदार - खासदारांना सावरकर काय आहेत? हे माहिती नाही. सत्तेसाठी किती लाचारी पत्करायची? आजही पेशव्यांचे दप्तर घेऊन डोके वाहत निघालो आहे. सावरकरांचे उदात्तीकरण देशासाठी चांगले नाही." अशी टीकाही लक्ष्मण माने यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त