देश सेवेमध्ये सैनिकांचे योगदान महत्त्वाचे.... डॉक्टर अतुल भोसले

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचा डॉक्टर अतुल भोसले यांना जाहीर पाठिंबा

कराड  विराज मल्टीपर्पज हॉल अटके टप्पा तालुका कराड या ठिकाणी कराड दक्षिण विधानसभा २०२४ महायुतीचे अधिकृत उमेदवार . डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आजी /माजी सैनिक मेळावा संपन्न. झाला.

 यावेळी सैनिक फेडरेश सातारा जिल्हा व कराड तालुका दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांचे वतीने माननीय श्री डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना विधानसभेच्या लढाईत जाहीर पाठिंबा देण्यात आला. पाठिंब्याचे लेखी पत्र,सैनिक फेडरेशनची कॅप, सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर अतुल भोसले यांना सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांनी आपल्या मनोगतामध्ये माजी सैनिकांच्या देशसेवेतील योगदानाचे मनापासून कौतुक केले.यावेळी माजी सैनिकांसाठी अधिक चांगल्या योजना राबविण्याची व आजी /माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही देण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील अनुभव आणि असलेल्या अपेक्षा सैनिकांन कडून जाणून घेतल्या गेल्या. यामध्ये समाज उभारणीसाठी माजी सैनिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करण्यात आले. व सैनिक फेडरेशन सातारा जिल्ह्याकडून विधानसभेच्या या लढाईत जाहीर पाठिंब्यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासाला नवी गती मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


या वेळी प्रशांत कदम (माजी सैनिक) अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन, कर्नल महादेव काटेकर, सत्यनारायण म्हासाळकर , सदाशिव नागणे अध्यक्ष कराड तालुका सैनिक फेडरेशन, नागेश जाधव अध्यक्ष माजी सैनिक पेन्शनर संघटना कराड तालुका .विलास चव्हाण साहेब, विठ्ठल भोसले साहेब, दिलीप पाटील साहेब, . राजाराम सावंत सुधीर जाधव, सर्जेराव देसाई, धनाजी जाधव,श्रीरामचंद्र देवकर, आर के पाटील, श्री संजय गावडे, रवींद्र पाटील, तानाजी पवार, संदीप पाटील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, सैनिक पत्नी, वीर पत्नी,वीर माता,वीर पिता हजारोच्या संख्येने सैनिक मेळाव्यास उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त