कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सेवा बळकट केली : ना. महेश शिंदे,
तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरण सुशोभीकरण व देखभाल दुरुस्तीचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभSatara News Team
- Tue 25th Jun 2024 03:57 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी राज्याच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट केला असून सामान्यातील सामान्य रुग्णाला वेळेवर औषध उपचार मिळावेत यासाठी यंत्रणा कार्यक्षम केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये सुपर-स्पेशालिटी रुग्णालये स्थापन करणे, ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करणे हे ध्येय आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आरोग्य सेवा बळकट केली जात असून सर्वसामान्यांना २४ तास औषधोपचार केला जात आहे. शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण केले जात आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरण सुशोभीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ना. महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. तालुका आरोग्य अधिकारी शंकर गांधीले, वैद्यकीय अधिकारी अनुराधा कांबळे, आरोग्य विस्तार अधिकारी व्ही. बी. ओंबळे, व्ही. एस. गुजर,
सरपंच मोहन माने, उपसरपंच निलेश झांजुर्णे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.
ना. शिंदे पुढे म्हणाले की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यात आली आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालय हे शंभर खाटांचे मंजूर झाले असून ट्रॉमा सेंटर देखील तेथे कार्यान्वित केले जाणार आह. प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम व बळकट केले जात असून तेथे आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देत आहे. कर्मचारी वर्गाची कमतरता भासून येत असून आवश्यक तो कर्मचारी वर्ग भरावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज करणे, रुग्णालयांना मजबुती देणे आणि वैद्यकीय महत्त्वाच्या पदांवर तातडीने नियुक्ती करणे यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. शंकर गांधीले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी कोरेगाव तालुक्यातील आरोग्य सेवेचा आणि तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यक्रमानंतर ना. महेश शिंदे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आरोग्य केंद्राची अत्यंत बारकाईने पाहणी केली व आवश्यकता सूचना डॉ. गांधीले यांना दिल्या.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषध निर्माण अधिकारी प्रशांत कांबळे, आरोग्य सहाय्यक एस. एम. चौगुले, जे. के. कदम, एस. जी. सय्यद, एस. डी. घाडगे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक यांनी परिश्रम घेतले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 25th Jun 2024 03:57 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 25th Jun 2024 03:57 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 25th Jun 2024 03:57 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 25th Jun 2024 03:57 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 25th Jun 2024 03:57 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 25th Jun 2024 03:57 pm





