साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांबाबत संस्थेचे मौन तर नागरिकांचे उपोषण...
अजित जगताप - Wed 17th Jul 2024 05:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा दि: बहुजन समाजाला शिक्षणाची द्वार खुली करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याच रयत शिक्षण संस्थेमार्फत रयत सायन्स अँड इंनोव्हेंशन ऍक्टिव्हिटी सेंटर रामनगर वऱ्ये या ठिकाणी आहे. सदरच्या कामाच्या निकृष्ट दर्जाच्या बाबत निवेदन दिले पण त्याची दखल घेतली नाही. अखेर जागरूक नागरिक मंदार गानु व सौ पल्लवी गानु यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सदरच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, रयत शिक्षण संस्थेच्या रामनगर - वऱ्ये येथील कामांचा ठेका नीरज प्रो प्राइवेट लिमिटेड पुणे या कंपनीला दिलेला आहे. त्याबाबत लेखी तक्रार रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
सदर संस्था योग्य ती कारवाई करीत आहे. असे पत्र दिनांक एक जुलै २०२४ रोजी पत्र पाठवून उपोषणाचे आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये .अशी विनंती केल्यामुळे उपोषण आंदोलन झाले नाही परंतु ,त्याबाबत प्रत्यक्षात जागेवर पाहणी केली असता रयत शिक्षण संस्थेने कोणतीही कार्यवाही केली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी व गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे.
सदर संस्थेमध्ये ग्रामीण भागातील बहुजन समाजाची अनेक मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. एखादी घटना घडून गेल्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जागी होते. परंतु, आता जे घडलेले आहे त्याबाबत जागृतपणाने माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नाही. याला लोकशाही म्हणायचे आहे का? असा प्रति प्रश्न उपोषणकर्ते श्री मंदार गांनु यांनी केलेला आहे. सदर उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, अजित जगताप व मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत एखाद्या ठेकेदाराची चूक दाखवून सुद्धा दुर्लक्ष होत असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार खरोखरच रयत शिक्षण संस्थेमध्ये अमलात आणले जातात की नाही? असा प्रश्न आता बहुजन वर्गाला पडलेला आहे.

छाया-- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले श्री गानु व पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते (छाया- निनाद जगताप सातारा)
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
संबंधित बातम्या
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 17th Jul 2024 05:00 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 17th Jul 2024 05:00 pm













