- पोलीस पाटील महासंघाचे भत्ता मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुसेगाव : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघातर्फे जिल्हयातील कार्यरत असताना निधन झालेल्या पोलीस पाटील यांच्या जागी वारसाची नियुक्ती करण्यासाठी व लोकसभा निवडणूक भत्ता पोलीस पाटील यांना मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

पोलीस पाटील महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यरत असताना निधन झालेल्या पोलीस पाटील यांचे जागी वारसाची नियुक्ती व्हावी, या मागणीची शासन गांभीर्याने दखल घेत नाही. कार्यरत असताना जिल्हयातील तीन पोलीस पाटील यांचे निधन झाले.

त्यामध्ये राजेंद्र मधुकर जाधव (वय 50, मृत्यू दि. 27 जानेवारी 2020, गोवे ता.सातारा), मंगेश वसंत लोखंडे (वय 43, मृत्यू दि. 18 आॅगस्ट 2023 कारखेल ता. माण), रमेश दादू जाधव (वय 43, मृत्यू दि. 14 मार्च 2024 मु. पो. गणेशवाडी ता. सातारा) यांचा समावेश आहे. त्यांच्या वारसांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी आहे.

तसेच सातारा लोकसभा मतदारसंघात दि. ७ मे रोजी मतदान पार पडले. सर्व निवडणुकीत पोलीस पाटील म्हणून गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राखण्याबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, मतदान साहित्य व कर्मचारी आल्यापासून मतदान पूर्ण होऊन परत जाईपर्यंत अनेक जबाबदा-या पार पाडाव्या लागतात.

निवडणुकीचा आदेश (ऑर्डर) नसला तरीही जादा जबाबदारी पार पाडली आहे. यापूर्वी पोलीस पाटील यांना ऑर्डर नसतानाही निवडणूक भत्ते दिले आहेत. इथून पुढील काळात पोलीस पाटील यांना निवडणूक कामातील आदेश काढणे गरजेचे आहे या बाबीचा गांभीर्याने विचार व्हावा व निवडणूक भत्ता देण्यात यावा, अशी विनंती निवदनात केली आहे.

या निवेदनावर पोलीस पाटील महासंघाचे अध्यक्ष मोहनराव शिंगटे, उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, सचिव गणेश बुधावले, खटाव तालुकाध्यक्ष सुनील रणसिंग, सातारा तालुकाध्यक्ष राहुल गुजर, पोलीस पाटील शंतनु झेंडे, जे. टी. कांबळे, समाधान साळुंखे यांच्या सह्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त