पुसेसावळी हत्याकांडातील फरारी आरोपी नितीन विर च्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या...

पुसेसावळी : पुसेसावळी येथे पुर्व नियोजित कट रचून घडवून आणलेल्या हत्याकांडातील एकुण १४ आरोपी फरार होते. त्यांचे विरोधात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचेकडून मा. जी.एम.गुंठे (निमदेव), दुसरे सह.दिवाणी न्यायाधीश 'क' स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, वडूज यांच्या न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट बाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.त्यास मा. न्यायालयाने मंजुरी देत अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यापैकी एकाच्या अल्पावधीतच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मुसक्या आवळल्या होत्या. तर इतर फरारी आरोपींच्या वतीने मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, वडूज येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.त्यापैकी एकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्याने हताश झालेल्या आरोपीस ताब्यात घेतले होते. त्यास अटकेनंतर काही कालावधीने मा. न्यायालयाने अटी शर्तींवर जामीन मंजूर केला.

        इतर आकरा अटकपूर्व जामीन अर्जापैकी २७ जून २०२४ रोजी नऊ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर आरोपी श्रीराम संजय रत्नपारखी आणि आदित्य सुनील देशमाने या दोहोंचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यासोबतच नितीन महादेव वीर याच्या अटकपूर्व अर्जावर पुढील तारीख देत सुनावणी सुरू होती. संबंधिताचे अर्ज दाखल झाल्यापासून सुमारे २४ तारखा पडलेल्या असून अलिकडील २ सप्टेंबर दिवशी असलेल्या तारखेलाच मा.अरूण देवकर, पोलिस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मार्गदर्शना खालील टिम ने घटनेपासून फरार असून गुंगारा देत असलेल्या आरोपीस घटनेस वर्षपुर्ती होण्याच्या आठ दिवस अगोदरच पुसेसावळी येथील आरोपीच्या राहत्या घराजवळच सापळा रचून संबंधित फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्याची चर्चा पुसेसावळी सह परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर संबंधित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मा.न्यालयात हजर केले असता मा.न्यायालयाने ४ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

 

फरारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात संबंधित पोलीस ठाण्याचे कारभाऱ्यांचा रोल काय?

    पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पुसेसावळी येथे घडली. त्यामध्ये उच्चशिक्षित इंजिनिअर नुरूलहसन लियाकत शिकलगार याची मशिदीत हत्या करण्यात आली. त्यामधील बहुतांश आरोपींचा वरचेवर पुसेसावळी सह परिसरात वावर असल्याची चर्चा सुरू होती आणि आजही आहे. परंतू फरार असलेल्या आरोपीस पुसेसावळी येथील राहत्या घराजवळच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सातारा येथील मुख्यालयातून हजेरी लावत ताब्यात घेतले असल्याने संबंधित आरोपी नेमके फरारी आहेत? कि औंध पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे "कार.. भारी" आहेत? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकारीच आरोपींना अभय तर देत नसतील? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त