कराडच्या कृष्णा पूलावरुन उडी टाकून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या....!!
कुणाल खंदारे - Sat 5th Nov 2022 10:48 am
- बातमी शेयर करा
कराड : कराडच्या कृष्णा पूलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांच्या मध्ये खळबळ उडाली असून अनेक जणांनी कृष्णा पूलावर धाव घेतली आहे. तर अनेक जण कृष्णा पूलाच्या खाली नदीपात्रात त्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.पूलावर पैलिस बंदोबस्त तैनात आहे.
दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या अध्याप संपले नसल्या तरी काही महाविद्यालय परिसरातील कॉलेजेस, क्लासेस सुरू असलेने कृष्णा पुलावरून रोज शेकडो विद्यार्थ्यांची ये जा सुरू आहे. आज दुपारी कॉलेज कडून कराडकडे येत असलेल्या विद्यार्थ्यांने कृष्णा पुलाच्या मध्यावरून नदीपत्रात उडी घेतली. त्यावेळी त्याच्या पाठीमागून येत असलेल्या दोघांनी हा प्रकार पाहिला. मात्र ते त्या विद्यार्थ्याला वाचवू शकले नाहीत. संबंधित विद्यार्थ्यांने नदीत उडी टाकल्यानंतर काही वेळाने तो अनेकांना दिसला, मात्र त्यानंतर दिशेनास झाला. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
सध्या कृष्णा पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात असून त्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक जण कुतूहलपोटी या पुलावर गर्दी करताना दिसत आहेत. संबंधित विद्यार्थी कोणत्या कॉलेजचा आहे, कोणत्या गावचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र त्या विद्यार्थ्यांने कॉलेजचा गणवेश परिधान केला होता असे पहाणार्यांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 5th Nov 2022 10:48 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 5th Nov 2022 10:48 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 5th Nov 2022 10:48 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 5th Nov 2022 10:48 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 5th Nov 2022 10:48 am
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 5th Nov 2022 10:48 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 5th Nov 2022 10:48 am













