अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

सातारा : साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. किल्ल्यावरून साधारण २०० फूट खोल दरीत कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून, 'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या कामगाराचा मृतदेह बाहेर काढला आहे.

      ​या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. संबंधित कामगार दरीत कोसळल्याचा कॉल आल्यानंतर टीमने दोरखंड आणि जीवरक्षक साहित्यासह दरीत उतरून शोधमोहीम राबवली. मात्र, दरीची खोली आणि पडताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत ट्रेकर्सनी या कामगाराचा मृतदेह दरीतून वर काढला असून तो आता पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

       ​हा कामगार नेमका कशामुळे पडला आणि तो किल्ल्यावर कोणत्या कामासाठी आला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी आणि कामगारांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला